Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शेणपूर ग्रामपंचायत सरपंच,सदस्यांसह शिष्टमंडळाने घेतली धुळे जिल्हा परिषद भाजपचे सदस्य व नवनिर्वाचित जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सौ.सुमित्रा साहेबराव गांगुर्डे यांची भेट
शेणपूर ग्रामपंचायत सरपंच,सदस्यांसह शिष्टमंडळाने घेतली धुळे जिल्हा परिषद भाजपचे सदस्य व नवनिर्वाचित जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सौ.सुमित्रा साहेबराव गांगुर्डे यांची भेट
साक्री प्रतिनिधी:आज दिनांक 8/9/ 2022 रोजी धुळे जिल्हा परिषदेचा शेलबारी गटाचा भाजपचे सदस्या व जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्या सौ.सुमित्रा साहेबराव गांगुर्डे रा.शेवडीपाडा यांची शेणपूर ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,व त्यांच्या गावातील शिष्टमंडळाने त्यांचा सपत्नीक सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेलबारी जिल्हा परिषद गटाचे भाजप नेते श्री साहेबराव गांगुर्डे यांच्याशी शेणपुर गावाच्या विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी शेणपूर ग्रामपंचायत शिष्टमंडळाने श्रीमती गांगुर्डे यांच्याकडे काही मुख्य विकास कामांची मागणी करून त्यांना निवेदन ही दिले.
त्यात मुख्यत्वे काँक्रेट रस्ता,अंगणवाडी व बालवाडी सुधारणा,सार्वजनिक सौचालय सुधारणा अशा अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.व त्यांनी या सर्व कामांची लवकरच सरकार दरबारी मागणी करून पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थिताना दिले.
यावेळी उपस्थित शेणपूर ग्रामपंचायत सरपंच श्री चंद्रकांत काळे उपसरपंच भूरू पवार व सदस्य प्रतिनिधी श्री.आकाश काकुस्ते,नंदकुमार काकूंस्ते,पृथ्वीराज काकूंस्ते,छबीबाई माळी,दादाजी थोरात, व त्यांचे सहकारी श्री.गणेश काकुस्ते,प्रवीण काकुस्ते,
सुनील काळे,दामोदर पगारे, चंद्रशेखर अहिरराव,मनोज घुगे,पंडित काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा