Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२
अन्न व औषध प्रशासनामार्फत मिठाई विक्रेत्यांवर कारवाई
नंदुरबार, प्रतिनिधी दि.7अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने नंदुरबार शहरातील जय खेतेश्वर स्वीटस्, भारती फूड्स आणि हरी ओम खेतेश्वर स्वीटस् यांची तपासणी त्यांच्याकडून मोतीचुर लाडू, इमारती,खवा आणि नवरतन चिवडा या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. तपासणी वेळी जय खेतेश्वर स्वीटस्, हरी ओम खेतेश्वर स्वीटस् या दुकानांमध्ये मिठाई विक्रेत्यांनी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केला नसल्याने तसेच अन्नपदार्थ किती दिवस वापरावे याबाबत माहिती दर्शनी भागात लावले नसल्याने दोन्ही दुकानावर कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या दिवसात खवा,मावा, मिठाई,खाद्यतेल,वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा