Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

अनेक वेळा लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन ,अखेर पंचायत समिती सदस्य अर्चना देसले यांच्या निवेदनाला लवकरात लवकर यश येणार मागण्या मान्य होणार....?



साक्री प्रतिनिधी:म्हसदी प्र.नेर काळगाव ककांनी भडगाव वसमार चिंचखेडा परिसरात.. नवीन रस्ते मंजूर करणेबाबत व रस्त्यांना काही ठिकाणी पूलांची मागणी व संरक्षण भिंत होणे बाबत..पंचायत समिती सदस्य सौ अर्चना देसले यांचे प्रतिनिधी मा.पंचायत समिती सदस्य राजधर देसले माऊली यांनी आमदार सौ मंजुळाताई गावित व तसेच अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे उपविभागीय कार्यकारी साक्रि यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहेे. 

ती लवकरच करण्याचे आश्वासन दिले आहे आम्ही तात्काळ लवकरात लवकर काम पूर्ण करू असे आश्वासन दिले. परिसरातील रस्त्यांवर काळगाव ककांनी शेवाळी भडगाव या ठिकाणी पाण्याचा स्रोत जास्त असल्यामुळे पुल मंजूर करण्यात यावे कारण पाण्याचा प्रवाह डोंगराळ भाग असल्यामुळे आजूबाजूला शिलटिंग होते त्यामुळे काही ठिकाणी लहान पाईप मोरी असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जाणे शक्य होत नाही.त्यामुळे परिसरातील सर्वच रस्ते बंद होऊन जातात व दळणवळणाचा मार्ग बंद होतो त्यामुळे त्या ठिकाणी पाईप मोरीएवजी स्लॅप पुल मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे. 

जेणेकरून पाणी व टॉप होणार नाही व गावांचे संपर्क तुटणार नाही तसेच काळगाव रस्त्यावरील व ककांनी, ,
भडगाव रस्त्यावरील लवकरात लवकर आपल्या स्तरावरून रस्ता व पूल मंजूर करावा तसेच नेर ते महस् दी धमणार ककांनी भडगाव काळगाव रस्त्याची खूपच दुरावस्था वाईट झाली असून आजूबाजूला सर्व परिसरातील रस्त्यांच्या बाजूला काटेरी झुडपे तयार झालेली आहेत तरी ती लवकरात लवकर काढण्यात यावी त्या ठिकाणी अपघाती वळण असल्याने जंगल परिसरातील त्यामुळे खूपच मोठे एक्सीडेंट होत राहतात तसेच रस्त्याची खूपच वाईट अवस्था झालेली आहे 

त्या ठिकठिकाणी वळणावर दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर तात्काळ मंजूर करण्यात यावी ही विनंती असे याच्या पहिले अनेक निवेदने दिले आहेत लोकप्रतिनिधींना त्यांनी लवकरात लवकर निवेदनाच्या मागण्या मान्य होणार असे लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे निवेदनांना यश येणार से पंचायत समिती सदस्य सौ अर्चना देसले यांचे प्रतिनिधी मा. पंचायत समिती सदस्य राजधर देसले माऊली यांनी सांगितले आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध