Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य महिला आयोग मान्यताप्राप्त महिला व बाल विकास विभाग जिल्हा परीषद धुळे अंतर्गत
महाराष्ट्र राज्य महिला आयोग मान्यताप्राप्त महिला व बाल विकास विभाग जिल्हा परीषद धुळे अंतर्गत
क्रांती बहुउद्देशिय महिला संस्था संचलित कौटुंबिक सल्ला व महिला समुपदेशन केंद्र साक्री (तालुका स्तरीय)
महिला सक्षमीकरणात महिला समुपदेशन केंद्राची भुमिका महत्वाची आहे मा. प्रतिभाताई सुर्यवंशी सो. सभापती पंचायत समिती साक्री
यांनी धुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोग मान्यता प्राप्त महिला व बाल विकास विभाग धुळे अंतर्गत क्रांती बहुउद्देशिय महिला संस्था संचलित साक्री तालुका स्तरीय कौटुंबिक सल्ला व महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन आज दिनांक :- 2/9/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न झाले सदर केंद्राचे उद्घाटन मा. प्रतिभाताई पंकज सुर्यवंशी. सभापती पंचायत समिती यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष स्थानी मा.जे.टी. सुर्यवंशी सो. गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन मा. संध्याताई बोरसे सो. प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मीक बाल विकास योजना साक्री हे होते तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक अॅड. चंद्रकांत येशीराव तसेच माजी. कक्षांधिकारी एस.एन. जगताप साो. महिला व बाल विकास विभाग जि.प.धुळे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रविण थोरात सो, निलेश तोरवणे सो,अनिल महाले सो. रावसाहेब शिंदे सो, रोहिदास सावळे साो, मिलिंद वाणी सो, समुपदेशक- हर्षदा वाणी सो, तेजस्विनी धाकड़ सो, तसेच संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक- प्रथमेश अहिरे साो, इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांनी फित कापुन उद्घाटन केले. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात मा. प्रतिभाताई सुर्यवंशी यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्र यांची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. या केंद्रामुळे अनेक अत्याचारग्रस्त, पिडित महिलांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली. मा. श्री.जे.टी.सुर्यवंशी सो. गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, केंद्राला सर्व प्रकारची मदत पंचायत समिती स्तरावर देण्यात येईल, केंद्र चांगल्या प्रकारे चालवावे, काही अडचण आल्यास सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दामिनी केंद्राचे समुपदेशक व ग्राहक फॉऊन्डेशनचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश अहिरे यांनी मानले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा