Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या बैठकीत नवरात्र उत्सव शांततेत नियमांचे काटकोर पालन करीत साजरा करा- सुनील भाबड



शिंदखेडा ( यादवराव सावंत )प्रतिनिधी 
शिंदखेडा शहरात अंतर्गत येणाऱ्या गावात जातीय सलोखा उत्तम आहे म्हणून शिंदखेडा शहर व परिसरातील गावे जातीय सलोखा जोपासणारे म्हणून ओळखले जाते,सर्वजण गुण्यागोविंदाने सण,एकत्र येऊन सण साजरे केले जातात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा महिला सुरक्षितेबाबत नवरात्र उत्सवात स्वयंसेवकांची नेमणूक करा,गरबा रास दरम्यान महिलांची छेडछाडीचे प्रकार घटना याबाबत खबर खबरदारी बाळगा नवरात्र उत्सवात आनंदाने उत्साहाने साजरा करा मात्र उत्सव साजरी करत असताना आपल्या घरातील व्यक्ती घरी थांबा कारण अशा वेळेस चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते,तसेच जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी असल्याचे सोशल मीडियावर, मेसेज व्हायरल होताना दिसत आहे.

असे कुठेही तालुक्यात टोळी सक्रिय नसून कुठलाही गुन्हा अद्याप पर्यंत दाखल झालेला नाही असे अफवा पसरवण्यात येणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात येतील काही आढळल्यास  पोलीस स्टेशन किंवा पोलीस पाटलाची संपर्क साधावा असे आव्हान शिंदखेडा पोलीस  पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी पोलीस पाटलांच्या बैठकी बोलताना सांगितले.शिंदखेडा येथे  शिदखेडा,पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटलांची नवरात्र उत्सवानिमित्त बैठक घेण्यात आली यावेळी एपीआय प्रशांत गोरावडे. अनंत पवार, पीएसआय एपीआय,
केदार आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना भाबड यांनी नऊ दिवस उत्साहात कायद्यात व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी खबरदारी म्हणून काळजी घ्यावी यावेळी डॉक्टर महेंद्र पाटील, शिवाजी पाटील, मनोहर पाटील,युवराज माळी,चरणसिग गिरासे, संजय खैरनार,भैय्या नगराळे, गणेश गिरासे, सुरेश कोळी ,प्रदीप गिरासे, अनिता पाटील व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध