Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२६
Home
/
/
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्याशी चर्चा.
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे आणि जयश्री वाबळे यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात केली.
1) मध्यवर्ती सरकारच्या पातळीवर स्पर्श प्रणालीचे काम पूर्ण झालेले असून मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे येत्या 8 दिवसात थकीत मानधन अदा करण्यात येईल. 2)सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी ( उपदान) देणेबाबत प्रस्ताव तयार असून मंत्रिमंडळाची मान्यता तातडीने घेण्यात येईल.
3) FRS प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.तसेच पर्यवेक्षिकांच्या पदांच्या भरतीबाबत मा. मंत्री महोदय यांच्यासूचनेनुसार कार्यवाही करण्यात.
4) महिन्याच्या उन्हाळी सुटी एक महिन्याची देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे चर्चेत सांगितले.
या व इतर प्रश्नांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत समन्वय समितीचे निमंत्रक श्री.युवराज बैसाणे,श्रीमती जयश्री वाबळे, अमोल बैसाणे यांनी भागीदारी केली.असे संजय मापले, रामकृष्ण बी.पाटील,संगीता गागरे,चंदा नवले,सत्यभामा रंगारी, राजू पाटील,वकील पाटील यांनी कळविले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा