Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील कासारे नगरीत मा.कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा विविध विकास कामाचा व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!
साक्री तालुक्यातील कासारे नगरीत मा.कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा विविध विकास कामाचा व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!
साक्री प्रतिनिधी: तालुक्यातील काटवान परिसरातील कासारे हे गाव बाजारपेठेचे आर्थिक उलाढालीचे केंद्र सत्ता केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यातच गेल्या पाच वर्षापासून माझी शिवसेना तालुका प्रमुख प्रमुख व सद्या शिंदे गटात कार्यरत असणारे जननायक श्री.विशाल अनंतराव देसले यांची गेल्या पाच वर्षांपासून लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली होती.
गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्या चा विडा दादा भुसे साहेबांनी उचलला आणि विशाल देसले यांच्यामार्फत विकासाची गंगा कासारे गावात व पंचक्रोशीत सामान्य नागरिकांपर्यंत कशी पोहोचवली जाईल याचा विचार करत अनेक विकास कामे केली गेली त्यात स्मशानभूमी असो काँक्रिटीकरण तसेच बैठक व्यवस्था,भूमिगत गटारी,
ग्रामपंचाय बांधकाम तसेच प्रशस्त इमारत अनेक ठिकाणी फेवर ब्लॉग्स काही खेड्यांना जोडले जाणारे रस्ते,
पूल,पांदण रस्ते, शिवस्मारक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचे देखील स्मारक एक मोठं काम सध्या प्रगती पथावर आहे एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा आपला साक्री तालुका,त्यावेळेस
तालुक्यात बोटावर मोजण्या इतके शिवसेनेचे कार्यक्षेत्र होते.
म्हणून तालुक्यात शिवसेना बळकट करण्यासाठी एका कुशल संघटक व कर्तुत्ववान नेतृत्वाची गरज होती.
आणि हे नेतृत्व दादाजी भुसे साहेब यांच्या छत्रछायेत विशाल बापू देसले यांच्या रूपाने तालुक्याला लाभले.
आणि जणू काही विशाल बापूंनी तालुक्यातील जनतेच्या प्रशासकीय अडीअडचणी, सामाजिक प्रश्न, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणे असा एक प्रकारे मनात चंगच बांधला यात बापूंसोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेले आहेत तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या की कोणतीही समस्या असो विशाल बापू आमचे कामे मार्गी लावतील... असंख्य लोक माता,भगिनी बापूंकडे समस्या घेऊन येऊ लागले त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीज्ञसाक्री
तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा तहसील कार्यालयाच्या समोर जनसंपर्क कार्यालय म्हणून ऑफिसची उभारणी केली आणि जनता दरबार सुरू केला.
आणि आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी विशाल बापू सारखे नेतृत्व रुपी रोप तालुक्यात लावले आणि बघता बघता आपल् समाजकारण लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची धमक कार्यकर्त्यांचा संपर्क यांच्या जोरावर विशाल बापू यांचे वटवृक्षात रूपांतर झाले.
आणि हे तालुक्यातील स्वयंघोषित नेते मंडळींना खटकत होते, त्यांनी मागील काही काळात वटवृक्षाच्या फांद्या छाटण्याचे काम खूप जोमाने केले.
मात्र अपयशी ठरले कारण विशाल बापू सारख्या वटवृक्षाचे मूळ कार्यकर्त्यांच्या रूपाने संपूर्ण तालुक्यात दूरवर घट्ट धरून पसरलेले होते.
याचं जिवंत उदाहरण विशाल बापू ज्यांनी शिवसेना पक्ष तालुक्यात वाढवला आज शिवसेनेचे कोणतेही पद नसताना आजही जनसंपर्क कार्यालय जनता दरबार सर्वसामान्य लोकांसाठी चालू आहे....तोच जोश काम करण्याची तीच पद्धत अभिमानास्पद आहे.
आणि असे मानले जाते की दादाजी भुसे साहेब हे विशाल बापू यांचे गुरु आहेत.
आणि आपले गुरु नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या करकमलाने कासारे येथील विकास कामांच्या भव्य उद्घाटन सोहळा प्रसंगी विशाल बापू देसले यांनी तालुक्यातील व गावातील आपल्या कामाचा दाखला पंचक्रोशीतील जनतेसमोर मांडला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा