Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आम आदमी पार्टी (शेतकरी) पक्षाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली व यावेळी साक्री तालुक्यातील अनेक तरुणांनी आप मध्ये प्रवेश केला
आम आदमी पार्टी (शेतकरी) पक्षाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली व यावेळी साक्री तालुक्यातील अनेक तरुणांनी आप मध्ये प्रवेश केला
गेल्या महिनाभरा पूर्वीच साक्री तालुका आम आदमी पार्टी (शेतकरी) कार्यकारणी जाहीर करण्यात आले आहे. व गेल्या महिनाभरापासून साक्री तालुक्यातील अनेक भागातून प्रामुख्याने तरुण,शेतकरी, कष्टकरी,कामगार,उद्योजक,व्यापारी,अशा अनेक क्षेत्रातील कार्यकर्तेनी स्वयंपुर्तीने आप या पक्षात प्रवेश करीत आहेत आणि ही साक्री तालुक्यातील चालू असलेली पक्षाची घोडदौड भविष्यात येणाऱ्या वादळाची शांतपणे चालू असलेली तयारी म्हणता येईल तसे पाहता साक्री तालुका हा महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा आणि आदिवासी बहुल असा तालुका आहे या तालुक्यात अनेक राजकीय चढ-उतार पाहिले आहेत.अनेक वेळा या तालुक्यातील लोकांनी मुख्य प्रादेशिक पक्षांना घरी बसून अपक्षांच्या हाती देखील सत्तेचे सूत्र दिलेले आहेत म्हणून साक्री तालुक्याची ओळख ही महाराष्ट्रात नेहमी विविधतेने नटलेली असते.या तालुक्याचा इतिहास पाहता या साक्री तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मंत्रिपदे देखील भुषवलेले आहेत परंतु तालुक्याच्या दृष्टीने पाहिजे तसा विकास या तालुक्याचा झालेला नाही परंतु आता महाराष्ट्रात उठलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचा आता प्रस्थापित राजकीय पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. म्हणून या देशाची राजधानी दिल्ली सह पंजाब,गुजरात, महाराष्ट्र,हिमाचल प्रदेश,अशा अनेक राज्यात आम आदमी पार्टी पक्षाने मुसंडी मारली आहे. पंजाब आणि दिल्लीवर थेट राज्याच्या सत्ता काबीज केल्या आहेत.व गुजरात मध्ये देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाला मान्य करीत अनेकांनी या पक्षात येण्याचे धाडस केले आहे अत्यंत कमी कालावधीत त महाराष्ट्रात देखील या पक्षाने आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे माननीय मुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष श्री.अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी पक्षाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा जणू एक विक्रम केला आहे असेही जाणवते आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विधानसभा क्षेत्रात देखील या पक्षाने खूप मोठी मजल मारली आहे यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठ मोठ्या दिग्गज नेत्यांचे धाबे देखील दणाणले आहे या दृष्टीने महाराष्ट्रात देखील आम आदमी पार्टीचे नेतृत्व उदयास येत आहे यानिमित्ताने विशेष करून धुळे जिल्ह्यात अत्यंत कमी कालावधीत जनतेपर्यंत पोहोचून आपली कार्यप्रणाली लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम आदमी पार्टी हा पक्ष अत्यंत प्रभावी ठरला आहे.आणि याच धर्तीवर धुळे जिल्हा कार्यकारणी देखील तयार करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री बिपिन पाटील यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.त्यात मुख्यत्वे धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री ईश्वर पाटील(दोंडाईचा) उपाध्यक्ष म्हणून श्री. संजय बहिरम (गव्हाणीपाडा) जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कैलास भदाने.(उभटी) तसेच धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. त्यात साक्री तालुका अध्यक्ष म्हणून श्री चंद्रशेखर अहिरराव (पत्रकार) धाडणे. व उपाध्यक्ष म्हणून श्री प्रवीण काकुस्ते शेणपूर.साक्री तालुका सचिव म्हणून श्री.राजेंद्र सोनवणे(धमणार) तसेच पिंपळनेर तालुका अध्यक्ष म्हणून श्री राजीव राऊत(वार्सा) यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा