Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२
शिरपूर शहरातील महर्षी वाल्मिक ऋषी जयंती आयोजित कार्यकारणी जाहीर
शिरपूर/प्रतिनिधी- दि.18 रोजी शिरपूर शहरातील संध्याकाळी 7 वाजता वाल्मिक नगरमधील कोळी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती निमित्त समाजाची बैठक संपन्न झाली.
या बैठकित सर्वानुमते 9 ऑगस्टोंबर रोजी होणार्या महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच आयोजित केलेल्या बैठकित यावेळी ज्येष्ठ व तरुण कोळी समाजाचे विविध संघटनांचे व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.आणि वाल्मिक नगरातील स्थानिक समाजबांधव व कुंभार टेक येथील कोळी समाज बांधव उपस्थित होते.
त्यावेळी सर्वानुमते महर्षी वाल्मिकी ऋषी उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश कोळी यांची तर उपाध्यक्ष रोहित कोळी,अजिंक्य काळी,खजिनदार राहुल कोळी,सचिव भटु कोळी,सहसचिव पप्पु कोळी,कार्याध्यक्ष सागर कोळी यांच्या पदी निवड करण्यात आलेली आहेत.
यावर्षी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर पहिल्यावेळा समाजबांधव सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आणण्याचा निर्धार आहे,असेही शेवटी दिनेश कोळी यांनी सांगितले आहे.
चौकट :-
देशात दोन- तीन वर्षे कोरोना च्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे महर्षी वाल्मिकी जयंती ही स्थानिक विविध ठिकाणी समाजबांधवांनी वाल्मिक ऋषींचे प्रतिमा ठेवून पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आल्या होत्या.परंतु यावर्षीं शहरातील व तालुक्यातील संपुर्ण समाज बांधव उत्साहाने एकमताने शिरपूर शहरातील वाल्मिक नगरमधून भव्य वाल्मिक जयंती मिरवूण उत्साहपुर्ण काढणार आहोत.
उत्सव समिती अध्यक्ष :- दिनेश कोळी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा