Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२
तब्बल15 वर्षानंतर भरला आर.सी.पटेल डी.एड कॉलेज विध्यार्थांचा स्नेहमेळावा
शिंदखेडा प्रतिनिधी - दि.२८ ऑक्टोबर२०२२ रोजी आर.सी.पटेल डी.एड.कॉलेज, शिरपूर येथे डी.एड. बॅच २००५-०७ चा स्नेह मिलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा.श्रीमती मंगला पाटील होत्या.प्रमुख मान्यवर प्रा.आर.एच.पाटील,प्रा.धंगेकर मॅडम, प्रा.सविता पाटील या होत्या.
याप्रसंगी डी.एड.बॅच च्या सर्वांनी आपआपली मनोगते व्यक्त केली. गेल्या १४ वर्षातील प्रगती,अनुभव,जुने मित्र व तेव्हाच्या गमती-जमती, संघर्ष, रूम-हॉस्टेल-मेस च्या आठवणी,
अडचणी,मज्जा या बाबत यथेच्छ मनमोकळे पणाने अनुभव कथन करत हशा देखील पिकवला.आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सवंगड्यानी अश्रूंना वाट देखील मोकळी करून दिली.गाजलेली गाणी देखील काही जणांनी सादर केली.दुसऱ्या प्रहरात स्नेहभेजनाच्या मेजवानीत विविध ॲक्टिविटी अंतर्गत मनोरंजक प्रश्नोत्तरे घेण्यात आली. सर्वांना गिफ्ट देखील देण्यात आले. सोहळ्याला संदीप कुलकर्णी,योगेश चवरे,योगेश बोरसे,संदीप हेरोडे,जगदीश महाजन,प्रदीप पाटील,श्याम कदम, भिमट्या गावित,संदीप पाटील,दीपक पाटील,संदीप ब्राह्मणकर,रितेश चित्ते,राकेश बेहरे,रोहिणी बाविस्कर, शितल पाटील,सुषमा पाटील,छाया बुवा,भारती कापडणे,दिपाली काळे,दिपाली पालवे,नीलिमा ढोले,दिपाली सुर्यवंशी,जयश्री पाटील,गंगासागर परिहार,शारदा पाटील,माधवी चव्हाण,सुनीता लोहार,ज्योती राठोड,शारदा सोनवणे,जयश्री कोळी इ.हजर होते.भविष्यात काही वर्षांनी पुनश्च असेच भेटू असे म्हणत सर्वांनी एकमेकांना निरोप दिला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा