Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

असाध्य आजरांना दुरुस्त करणारा आरोग्याचा महामेरू, मला भावलेले एक अवलिया जादूगार, डॉ.पी.एफ.जैन. जळगाव (पारोळा)



जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील येथील डॉ.पि.एफ.जैन हे होमिओपॅथी डॉ.असून् ते असाध्य आजार खात्री देऊन अनेक रुग्ण चांगले करतात. त्यांनी आताच दोन दिवसापूर्वी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यात नावीन्य पूर्ण आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला.ते स्वतः आजच्या कर्यक्रमाचे सत्कार मूर्ती असून त्यांचा सत्कार समारंभ न ठेवता त्यांचे सर्व रुग्णाचा सत्कार त्यानि स्वतः करून रुग्णाचा आनंद द्विगुणित केला.तदनंतर काही विशेष मान्यवरांची भाषणे झाली.रुग्णाचा सत्कार करून त्यांनी रुग्णना तुम्ही आता माझे शेहशहा झालात असे आगळे वेगळे शब्द वापरून त्यांनी कार्यक्रम हॉल मध्ये नेले.कार्यक्रमात ज्या फॉर्मॅलिटी असतात त्या कुठल्याही न वापरता डायरेक्ट कार्यक्रम सुरु केला.अनेक मान्यवरांनी त्यांच्या समाजिक, राजकारणी व वैदयकिय् क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव सांगितले. त्यांनी पूर्वी जे भयानक हलाकीचे जीवन काढले आणि त्यांच्या पत्नीने त्यांना कशी साथ दिली ह्या विषयी सर्व माहिती त्यांच्या मुलाने दिली.आणि कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नियोजनातील एकही मिनिट इकडे तिकडे न होता हा कार्यक्रम सम्पन्न झाला. उच्च पदावर असलेले लोक येतील आणि मग कार्यक्रम सुरु होईल असा कुठलाही प्रकार नव्हता. सर्व गरीब, श्रीमंत ,रुग्ण असा कुठलाही भेदभाव न करता घड्याळ्या च्या काट्यावर चालणारा कार्यक्रम मी माज्या 26 वर्षातील नोकरीत ला पहिला कार्यक्रम बघितला.मी स्वतः एक रुग्ण असून गेली अनेक वर्षांपासून अलोपेथिचा गोळ्यांच्या साईड इफेक्ट ने 27 वर्षा पासून झुंज देत आहे.अनेक नामवन्त डॉक्टरांचा औषोधोपचार घेऊनही मी त्रासापासून मी खूप वैतागली होती.आम्हाला डॉ.जैन यांच्या होमिओपॅथी औषधउपचारा विषयी आमच्या एका नातेवाईकांनी त्यांच्या विषयी काही किस्से सांगितले.आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या डॉक्टरांना गाठले.माझ्या आजाराविषयीं सर्व माहिती जाणून घेऊन लगेच औषोधोपचार सुरु केले आणि आम्हाला जागेवरच रिजर्ट दाखवला. आणि माझा आजार 100% पूर्ण बरा होईल अशी ग्वाही देणारे 26 वर्षात मला पहिले डॉ.भेटले. ते म्हणजे डॉ.पि.एफ.जैन.(पारोळा) होय.आणि खरोखर आज मला 25% फरक पडला आहे. माझी भाची 4 वर्षाची असताना अचानक तिला बाल संधिवात आजाराने ग्रासले होते .सगळे मोठे मोठे नामवन्त तज्ञ डॉ.ना दाखवून सुद्धा तीचि प्रकृती सुधारत नव्हती आणि आता डॉ.जैन यांच्या औषधाने ती 50% बरी झाली आहे. माझ्या भावाचे मेंदूचे दोन वेळा ऑपरेशन करून सुद्धा रिलीफ न मिळता उलट त्याला अनेक वेगवेगळे त्रास सुरु झाले होते आणि त्याची स्मृती देखील गेली होती ह्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने व औषोधोपचाराने आज तो 50% बरा होऊन त्याने त्याचा व्यवसाय स्वतः पुरवत् सुरु केला.आमचे वडील संधी वाता ने खूप ट्रस्ट होते.ते खूप वर्षांपासून खाली बसु शकत नव्हते ते आता मांडी घालून जेवायला बसतात. ह्या सर्व अनुभवातून मला एक लक्षात आले की होमिओपॅथी औषध हे किती गुणकारी आहे याची प्रचिती मिळाली.असे डॉ.आज आपल्या जिल्याला नव्हे, राज्याला नव्हे तर देशाला खरच गरजेचे आहे त्याने आपला देश नक्कीच व्ह्याधि मुक्त होईल.असो अश्या ह्या डॉ.जैन दाम्पत्यास् मी लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी आरोग्यदायी जाओ आणि त्यांच्या हातून अशीच रुग्ण सेवा घडो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

लेखन- सौ.प्रज्ञा नेर प्रा.शिक्षिका साक्री

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध