Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे हे काय जळगावातील डॉक्टरवर हनी ट्रॅप, व्हिडीओ तयार करून मागितली खंडणी....
अरे बापरे हे काय जळगावातील डॉक्टरवर हनी ट्रॅप, व्हिडीओ तयार करून मागितली खंडणी....
जळगाव प्रतिनिधी: जळगाव २० ऑक्टोबर २०२२ राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी हनी ट्रॅपचे प्रकार उघड झाले आहे.जळगावात देखील एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून ७ लाखांची खंडणी मागण्यात आली आहे.याप्रकरणी शहर पोलिसात ४ महिला व ३ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रामानंद नगरात राहणारे डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये सेवा बजावतात. दि.१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान काही तरुण तरुणींनी त्यांना अडकविण्याच्या उद्देशाने कट तयार केला.
एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर देत त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले.इतर तरुणांनी डॉक्टरांना मारहाण करीत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली.पैसे दिले नाही तर व्हिडीओ समाजात व्हायरल करीत जिवनातून उठवून टाकण्याची धमकी दिली.
डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सि...
-
अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी त्यांनी प्रथम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा