Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी..



सोलापूर प्रतिनिधी:अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने निराधार मुलांसोबत व साठ गरीब कुटुंबांना फराळ देवुन दिपावली साजरी करण्यात आली.

दिपावली हि नवचैतन्याची प्रकाशाची गोड धोड खावु खाण्याची दिपावली हिच दिपावलीची ओळख आहे.
पण आज ही अनेक लोक आहेत कि त्यांना त्याच्या परिस्थिती मुळे दिपावली सण साजरी करणे मुश्किलच तेव्हा सण वार हे सर्वानी ऐकत्र येवुन एकमेकांच्या सुखःदुखात सहभागी होवून सण साजरे करावे ह्याचीच प्रेरणा देतात तेव्हा हिच प्रेरणा घेवुन अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने वंचितांन बरोबर राहून त्यांना फराळ व संसार उपयोगी धान्य 
देवुन दिपावली साजरा करण्यात आली.

यंदाच्या वर्षी हि दिपावली निमित्त गुळवंची येथे १४ अनाथ बालकांचा सांभाळ करणारे संतोष सर यांच्या येथे मुलांना फराळ ,फटाके , धान्य तसेच एका आजीला साडी हि भेट देण्यात येवून दिवाळी सण साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी  सचिन तळेकर, संजय साळुंखे, अक्षय अंजीरखाने, रामेश्वर सुरवसे यांच्या समवेत  साजरी करण्यात आली.

यावेळी संजय साळुंखे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेचे सर्व कार्यक्रम हे प्रेरणादाई असतात व आवश्यक तेच कार्यक्रम घेवुन अनेकांच्या मदतीला धावुन येतात त्यांना शक्य तेवढे मदत करतात असेच कार्यक्रम सर्व संस्थानी करावे असे मत व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध