Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आरटीओ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अनाधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांची दसऱ्यासह दिवाळीही साजरी...नैतिक कर्तव्यापासून भरकटलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्याशिवाय शांतता नाही..
आरटीओ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अनाधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांची दसऱ्यासह दिवाळीही साजरी...नैतिक कर्तव्यापासून भरकटलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्याशिवाय शांतता नाही..
शिरपूर प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यात अनधिकृत पणे विनापरवाना टू व्हीलर विक्रेते यांचा मोठा सुळसुळाट झालेला असल्याने धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर आता शिरपूर व शिंदखेडा या दोन तालुक्यातील संबंधित तहसीलदार,पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपरिषद नगरपालिका यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आलेली आहे. सदर तक्रारी अर्जात तालुक्यातील अनाधिकृतपणे विनापरवाना वाहन विक्री करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्याबाबत तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.दाखल करणार आलेल्या तक्रारीत प्रकर्षाने खालील मुद्दे आहेत...
शिरपूर तालुक्यात केवळ तीनच अधिकृत परवाना धारक टु व्हिलर विक्रेते आहेत.तर शिरपूर शहरातील उर्वरित सुप्रभा मोटार्स बजाज आंबिका नगर रोड,श्री दत्त कृपा होडा शिरपूर फाटा, हिरो विमलनाथ शिरपूर फाटा, भंडारी टीव्हीएस अयोध्या कॉम्पलेक्स मांडळ रोड ही अनाधिकृत पणे विना परवाना सर्रास टु-व्हिलर विक्री करत आहेत.तर होळनांथे येथील राज मोटार्स बजाज तसेच शिंदखेडा तालुक्यात एकही टु व्हिलर विक्रेत्याकडे अधिकृत वाहन विक्रीचा परवाना नाही.मग शिंदखेडा शहरातील गरिमा अँटो हिरो स्टेशन रोड शिदखेडा,श्री जी मोटार्स सर्विसेस बजाज पाटण चौफुली, नरडाणा येथील निर्मलाई मोटार्स बजाज आकांक्षा हॉटेल जवळ बेटावद सर्विस रोड नरडाणा,आकाश टि.व्ही.एस.मेन रोड नरडाणा इत्यादी टु-व्हिलर विक्रेते ही अनाधिकृतपणे विना परवाना ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली सर्रास वाहान विक्रीचा गोरख धंदा करीत आहेत.
या विनापरवाना वाहान विक्री करण्यायांवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.त्यावेळी त्यांच्या शोरूम मध्ये व गोडाऊन मध्ये असलेली सर्व वाहने जप्त करून ती वाहने त्यांनी कोठून जाणलीत त्याबाबत त्यांचा लेखी खुलासा घेऊन विनापरवाना धारकास वाहन विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या परवाना धारक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात यावा.व त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.ही अनाधिकृत टु व्हिलर वाहन विक्रीचा व्यवसाय कोणत्या वर्षापासून सुरु असून आजपावतो विकलेल्या वाहानांची यादी मिळवण्यात यावी.जेणे करून शासनाचा किती मोठ्याप्रमाणात जीएसटी कर बुडविला यांचे मोजमाप करणे सोपे जाईल व त्याबाबत जीएसटी विभागाला कळविता येईल.त्यामुळे जीएसटी अधिकारी हे दंडासह रक्कम वसुल करून शासन उत्पनात भर पडेल.तरी अश्याप्रकारे अनाधिकृतपणे विनापरवाना वाहान विक्री करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करून वेळीच चाप लावावा.जसे तक्रार अर्जात म्हटले आहे.
खरे पाहिले तर या अनाधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांवर परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक होते.त्यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन बरेच दिवस होऊन त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणजेच हे अनाधिकृत शोरूम धारकांच्या दिवाळी दसरा साजरा करून त्यांच्याबरोबर त्या परिवहन अधिकाऱ्यांच्या देखील दिवाळी दसऱ्याच्या मिठाईची बंदोबस्त करत होते.या भ्रष्टाचारी अधिकान्यांनी कोणतीच कारवाई केली नाही हे स्पष्ट होते.आणि म्हणूनच केंद्र व राज्य शासनाच्या महसूल विभागासह संबंधित मंत्र्यांकडे याची लिखित तक्रार सादर करण्यात आले आहे.कारण वेळोवेळी बातमी प्रकाशित करून व लिखित तक्रार दाखल करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने व अखेर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व आशीर्वादाने अनाधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांची दसऱ्यासह दिवाळी साजरी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच आपल्या नैतिक कर्तव्यापासून भरकटलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्याशिवाय सोडायचं नाही.असं जनमत निर्माण झालेले आहे.
(सविस्तर वाचा पुढील अंकात )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा