Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२
पोलीस स्टेशनमध्ये व्हीडीओ रेकॉर्डिंग करणे गुन्हा ठरत नाही-उच्च न्यायालय
पोलीस स्टेशन हे ‘गोपनीयतेच्या कायद्यांतर्गत’ ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये केलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.
वर्धा येथील रहिवासी उपाध्याय यांचे शेजार्यांबरोबर भांडण झाले. ते पत्नीसह वर्धा पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी शेजार्याविरुद्ध तक्रार दाखल केली.यावेळी उपाध्याय हे मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या प्रकरणी रवींद्र उपाध्याय यांच्याविरुद्ध गोपनीयता कायद्यानुसार (ओएसए) नुसार गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी उपाध्याय यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पिळे आणि वाल्मिकी मिनेझीस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.गोपनीयता कायद्यामधील ( ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट ) कलम ३ आणि २(८) नुसार पोलीस स्टेशन हे काही प्रतिबंधित ठिकाण नाही. तसा उल्लेख नाही.
तसेच या कायद्यामधील कलम २(८) मध्ये स्पष्ट केलेल्या प्रतिबंधित ठिकाणे हेही प्रासंगिकच आहेत.यामध्ये पोलीस स्टेशन आणि अन्य आस्थापनांपैकी एक असा उल्लेख केला जात नाही. असे खंडपीठाने स्पष्ट केले.तसेच उपाध्याय यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा खंडपीठाने रद्द केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा