Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त झालेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या वारसा तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त झालेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या वारसा तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी,यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्याने अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता आता अशा प्रकरणात तात्काळ दावा मंजूर करता येणार आहे.
संबंधित नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसास नुकसान भरपाई प्रदान होईल याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्ती आणि त्याबाबत लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने तसेच येणारा दिवाळी सणाचा कालावधी लक्षात घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये तात्काळ नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्यक्तीशः लक्ष घालावे.क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा व संबंधित नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसास दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई प्रदान होईल याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासन स्तरावरून मंजूर व प्राप्त रूपये ४० कोटी अनुदान सर्व वनवृत्तांना त्यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने वितरीत करण्यात आले होते. सदर वितरीत अनुदान पूर्णतः खर्च झाले असल्याने वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे संबंधित नुकसानग्रस्त व्यक्ती तसेच इतर ग्रामस्थांमध्ये वन्यजीव व शासनाप्रती असंतोष निर्माण होऊ नये तसेच वनविभागामार्फत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे संबंधित नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसास नुकसानभरपाई प्रदान केली जाते.
या प्रकरणी स्वत: वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालून शासनस्तरावरून या योजनेत उणे (-) प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिल्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या कायदेशीर वारसास अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता तात्काळ दावा मंजूर करून नुकसान भरपाई देण्यात येत आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सुमारास नरडाणा पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत ८८,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही ...
-
शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सि...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा