Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

कासारे गाव ठरले तालुक्यातील पहिले संपूर्ण डिजिटल विद्यालय बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय कासारे


बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय कासारेच्या माजी विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व वर्ग 40 इंची एलईडी टिव्हीने डिजिटल केले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे म्युझिक सिस्टीम,बायोमेट्रिक सिस्टीम आदी भेटवस्तूही दिल्यात.
जिजाऊ मंगल कार्यालय कासारे येथे हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.ए.एन.देसले यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव उत्तमराव पाटील, सचिव ॲड.एस.जे. भामरे,विश्वस्त डॉ. पी.डी.देवरे,संजय देसले,तज्ञ संचालक डॉ.एन.डी.नांद्रे, जि.प. सदस्य गोकुळसिंग परदेशी,प्रथम नागरिक सरपंच विशाल देसले, सुप्रसिद्ध उद्योजक ए.टी.देसले पं. स. सदस्या माधुरी चंद्रकांत देसले,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जैन,सुरेश पारख,माजी पं.स. सदस्य मनीषा देसले,माजी शि. वि. अधिकारी रमेश पटवे,बी.बी. पिंगळे,शशीभूषण देसले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. व्ही.डी. देसले यांचे प्रतिनिधी निलेश देसले,से. मु. व्ही.एल.भामरे,श्रीमती शुक्ल,एम.एल. सोनवणे,श्रीमती निशाने,एम.ए. भामरे,विलास देसले,भगवान नेरकर,वसंत भामरे,बि.आर. देसले,सुरेश गवळे, मुख्याध्यापक ए.एन.देसले, बाळकृष्ण तोरवणे, संजय गांगुर्डे आदींचा माजी विद्यार्थ्यांनी सन्मान केला.प्रास्ताविक मुख्याध्यापक ए. एन.देसले यांनी केले.सूत्रसंचलन बाळकृष्ण तोरवणे व श्रीमती चेतना देसले यांनी केले.आभार स्वप्निल हरळे यांनी मानले.विद्यमान शिक्षक एन.डी. जाधव,एस.डी.अहिरराव,तुषार सोनवणे,सौ.कविता देसले,सौ.रूपाली भदाणे,विकास शिंदे,निलेश देसले, संजय गांगुर्डे, जगदीश देवरे यांचाही सन्मान केला.सोहळ्याचे संयोजन माजी विद्यार्थी सर्वश्री सतिष पाटील,दिपक जाधव,योगेश नेरकर,शरद पाटील,मनोज दशपुते,किरण देसले,हेमराज गवळे,योगिता भामरे,सचिन नेरकर,संदीप देसले,गुरुप्रसाद देसले,जितेंद्र खैरनार,वैभवराज भामरे,मयूर भामरे, धीरज देसले,योगेश देसले,स्वप्निल हरळे, ऋतुराज ठाकरे, फरजाना पटवे, रंजना देसले यांनी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध