Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न....
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न....
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑक्टोबर 1932 रोजी केली होती त्यास 90 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी एकविसाव्या शतकातील समतेची आव्हाने या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस. पाटील प्रमुख अतिथी तथा स्पर्धेचे परीक्षक श्रीमती जयश्री पवार डॉ.राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.स्पर्धेची प्रस्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. भरत खंडागळे यांनी केले.स्पर्धेत एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकविसाव्या शतकातील समतेची आव्हाने यावर आपले मत मांडले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे शितल बाविस्कर,तेली फाविक,दीपक विश्वेश्वर यांनी तर उत्तेजनार्थ निशिगंधा पाटील व दिव्या पाटील यांना मिळाला.स्पर्धेच्या समारोपप्रसंगी परीक्षक श्रीमती जयश्री पवार व डॉ.राहुल इंगळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षा व यशस्वी करिअर साठी बहूमोला असे मार्गदर्शन केले.समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक अभिजीत भंडारकर यांच्या उपस्थितीत अतिथींच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी अश्विनी पवार व आभार प्रदर्शन शितल बाविस्कर यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री.योगेश पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयातील IQAC समितीचे समन्वयक प्रा.विजयकुमार वाघमारे व प्रा.धनराज ढगे,डॉ श्वेता वैद्य,डॉ अस्मिता सर्वेय्या,डॉ.अनिता खेडकर, डॉ एस आर चव्हाण,डाॅ.सोनवणे, प्रा. बोरसे,श्री.अनिल वाणी यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सि...
-
अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी त्यांनी प्रथम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा