Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

भारतीय जनसम्राट पार्टीची मुंबई येथे 9 नोव्हेंबरला राज्यस्तरीय बैठक




मुंबई (प्रतिनिधी) भारतीय जनसम्राट पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीची बैठक दिनांक 9 नोव्हेंबर 2022 बुधवार रोजी,व्यंजन हॉल 43 ओशिवारा लिंक प्लाझा ओशिवारा पोलीस स्टेशन जवळ लिंक रोड अंधेरी वेस्ट मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या सभेचे उदघाटन  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे हे करणार असून सभेचे अध्यक्षपद चित्रपट निर्माता तसेच भारतीय जनसम्राट पार्टी चित्रपट कलाकार तथा कामगार आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुशांशू माक जेबीएस ही भूषविणार आहेत या सभेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात येणार असून यावेळी महाराष्ट्र प्रदेशची कार्य समिती सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे तरी या सभेला प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध