Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

साक्री तालुक्यातील धाडणे ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी अद्यापही गुलदस्तातच, स्थानिक अधिकाऱ्यांचा लिपोतीचा प्रयत्न



मागील काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत धाडणे येथे भ्रष्टाचारा ची चौकशी करण्यासाठी काही अधिकारी धाडणे गावात आले होते.त्याच्या सुचेने नुसार आपण त्याना कुठं व कश्या प्रकारे पैशाच्या गैरव्यवहार करून कामाची बिल कशी काढली.तसेच सरकारी जीआर नुसार गावात झालेल्या घरकुल,संडास,आर ओ फिल्टर, रस्ते,नळ,अंगणवाडी रिपेअरिंग, अश्या अनेक कामाची दर्जा व पैशाची अपहार कश्या प्रकारे झाला तसेच कामे ही निकृष्ट व दर्जाहीन कसे आहेत हे त्यांना आपण पटवून दिले..
अश्या प्रकारे महिना भर उलटूनही त्याचा कडून प्रत्येक  विभागा कडून चौकशी चे आश्वासन देऊन ही कोणाच्या दबावाखाली येऊन चौकशी करण्यासाठी वेळ लांबवून टाळाटाळ करण्यात येत आहे.तसेच जे काम आधी होणे आवश्यक होते ते आता लिपा पोती करून पळवाट साठी अभय देण्यात येत काय असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे ?
त्याला अनुसरून आज साक्री पंचायत समितीत B.D.O. सूर्यवंशी सर यांना धाडणे ग्रामपंचायत भ्रष्टाचार व निधीचा अपहार कसा झाला त्याचे पुरावे म्हणून ग्रामपंचायत कडून झालेल्या व्यवहार आणि बँकेच्या खात्यातुन गावातील कामाच्या नावाने काढलेल्या रक्कम चे चेक याच चेक बुक पुरावे फाईल मध्ये देण्यात आले.तरी सदर पुरावे हे ग्राह्य धरून निःपक्षपाती पणे गावात चौकशी करून गावातील अनियमित कामाचा अहवाल दयावा व तसेच या प्रकरण संबंधित व्यक्ती वर फोजदारी गुन्हे दाखल करून भ्रष्टाचारा ची रक्कम ही वसूल करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले..
हे आज टाकण्यामागे कारण असे की गावा मध्ये जागरूकता निर्माण व्हावी..नागरिकानी कामान विषयी प्रशासकीय यंत्रणेला प्रश्न विचारावे
तसेच मागील काही दिवसांन पासून ज्या गावकऱ्यांना चौकशी विषयावर उत्सुकता होती की पुढे काय झालं त्याना आवर्जून सांगू इच्छितो की भ्रष्टाचार ला कसल्याही प्रकारची थारा नाही..निर्णय येण्यासाठी उशीर झाला तरी चालेल पण जे काही ते धाडणे गावातील गावकरी समोर सोक्षमोक्ष झालं पाहिजे..
आज पर्यंत जो काही भ्रष्टाचारा विरुद्ध जो लढा चालू आहे।त्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती ना हरण्यासारखं काही ही नाही आहे..आम्ही देतो तो फक्त आमचा वेळ..कारण वेळ अशी गोष्ट आहे जी चांगल्या चागल्या महारथी ना जमीनी वर आणते.. 
प्रयत्न ऐकच असेल की भविष्यात आपल्या  गावाचा विकास झाला पाहिजे.
जनतेचा पैसा हा जनतेला मिळालाच पाहिजे..
 
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध