Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
चहार्डी येथील तीन शेतकऱ्यांचे कापसासह इतर साहित्य लांबवीले शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
चहार्डी येथील तीन शेतकऱ्यांचे कापसासह इतर साहित्य लांबवीले शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी: तालुक्यातील चहार्डी शिवारातून तीन शेतकऱ्यांच्या शेतातून ५ क्विंटल कापूस ठिबक सिंचनच्या नळ्या,पाण्याची मोटर आणि पाण्याची मशीन असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी चोरून केला आहे.याबाबत करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील चहार्डी रहिवासी वंदना कैलास पाटील तसेच हर्षल प्रकाश पाटील आणि रवींद्र रमेश पाटील यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी २० नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोंबर दरम्यान ५ क्विंटल कापूस, १३ ठिबक सिंचन नळ्यांचे बंडल, १० हजार रुपये किंमतीची पाण्याची जलपरी आणि पाण्याची मशीन असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शेतातून चोरून येण्याचे समोर आले.
या संदर्भात तीनही शेतकऱ्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक मधुकर पवार करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा