Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

प्रहार जनशक्ती पार्टी तालुका अध्यक्ष जयेश बावाच्या पाठपुराव्याने श्रीमती दीपाली कुवर यांना एक लाख रुपयाचा धनादेश मिळून दिला



पेरेजपुर येथील कै.किशोर गुलाबराव कुवर चौतीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने बँकेकडून चार वर्षांपासून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकले त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याने त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलं, आई-वडील यांचा उदरनिर्वाह चा प्रश्न ऐरणीवर आणला असून श्रीमती दीपाली व त्यांच्या कुटुंबाला कुठलीही शासकीय मदतीविना मोठ्या संकटाचा सामना करून जीवन जगायला भाग होते
कैलासवासी किशोर यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, शहर अध्यक्ष पंकज पवार व दिव्यांग संघटनेचे संजय पाटील (धाडणे) तसेच नगरपंचायतचे नगरसेवक बाळासाहेब मुकेश शिंदे यांच्या कडून देखील विशेष प्रयत्न करण्यात आले सातत्याने तहसीलदार प्रवीण चव्हाण के पाठपुरावा चा सपाटा सुरू ठेवत प्रहार ने त्या पीडित महिलेला व कुटुंबाला न्याय देण्याचे काम केले, गोपीनाथ मुंडे (शेतकरी आत्महत्या) योजनेमधून कमीतकमी तीन ते चार महिन्यांच्या आत प्रत्यक्षात एक लक्ष रुपये धनादेश व डीडी स्वरूपात देण्यात आले, पीडित कुटुंबाला अर्थसहाय्य मिळाल्याने कै.दीपाली किशोर कुवर यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार झाला
उपस्थित विकास मोहिते, रुपेश सोनार, राजू भदाणे,

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध