Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२
कार्तिकी एकादशीनिमित्त बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सव चे आयोजन...
शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर बाळदे येथे कार्तिकी एकादशीनिमित्त दिनांक 4 नोव्हेंबर शुक्रवार रोजी श्री तापी परिसर विठ्ठल धाम ट्रस्ट चे अध्यक्ष माजी आमदार ह भ प संभाजीराव हिरामण पाटील यांच्याकडून यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षातून दोनदा यात्रा भरते पहिली आषाढी एकादशी तर दुसरी कार्तिकी एकादशीला यात्रा भरते भाविकांचे श्री पांडुरंग श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी साधारणता 20 ते 25 हजार भाविक येण्याची शक्यता विश्वस्त माजी जि.प.सदस्य श्री जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे आहे.
मंदिरात सकाळी काकड आरती ,अभिषेक ,हरिपाठ ,ग्रंथ पारायण वगैरे धार्मिक कार्यक्रम नित्य नियमाने होत असतात. दिनांक चार नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडेसात वाजता येथील प्रांत अधिकारी श्री प्रमोद भामरे सह पत्नीक श्री पांडुरंगाची महापूजा करतील.तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून नथमस्तक होत असतात .मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेले आहे तसेच मंदिर परिसरात ट्रस्टच्या वतीने व्यावसायिकांना पूजा ,फुलहार नारळ वगैरे विक्रेत्यांना जागा उपलब्ध करण्यात आले आहे या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले आहे मंदिरात सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी बाळदे ग्रामस्थ या ठिकाणी सेवा देत असतात श्री विठ्ठल धाम ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार ह भ प श्री संभाजीराव हिरामण पाटील सचिव निंबा पाटील माजी जी.प.सदस्य जितेंद्र पाटील विश्वस्त दृष्टांत मनोहर पाटील आदी यात्रेचे आयोजन करीत आहेत. रात्री आठ वाजता ह भ प म मुरलीधर महाराज कढरे कर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व बाळदे ग्रामस्थ यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा