Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

कासारे गावात वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजार बळवण्याचा धोका वाढू नये यासाठी,कासारे येथिल स्वराज संकुल च्या माध्यमातून मनसेचे नेते धीरज देसले यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने कासारे गावात धुरळणी केली..कासारे ग्रामस्थांनी केले धीरज देसलेच्या उपक्रमाचे कौतूक-



कासारे गावात डास- मच्छरांचा प्रभाव वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य प्रभावित होण्याचा धोका वाढू लागतो. परिणामी साथीचे आजार बळावण्याचा धोका देखील या निमित्ताने वाढतो. साथीचे आजार टाळता यावेत यासाठी कासारे बस स्टँड वरील स्वराज संकुलच्या माध्यमातून स्वखर्चाने कासारे गावातील सर्वच सहा प्रभागात धुरळणी करण्यास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.
ऋतुमान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे साथीचे आजार वाढू लागतात यात पुरुष महिलाच नव्हे तर लहान बालके अधिक प्रभावी होतात या सर्व बाबींना किमान प्रतिबंध घालता यावा यासाठी कासारे येथील स्वराज संकुलाच्या पुढाकाराने धिरज देसले यांनी पूर्ण गावात व गावाशेजारील गुरांच्या गोठ्यात आणि आवश्यक त्या सर्वच ठिकाणी धुरळणी करण्याचा योग्य निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
आगामी काळात कासारे गावातील साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्वराज संकुलच्या माध्यमातून धीरज देसले यांनी स्वखर्चाने पूर्ण गावात धुरळणी करत हा स्वराज संकुलाचा उपक्रम कौतुकास्पद असून या पुढील काळात गावातील नागरिकांनीही आपल्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी-प्राचार्य विकास देसले,
यावेळी कासारे येथील जेष्ठ नागरिक जयवंतराव देसले,रामदास देसले मुरलीधर देसले,वामन देसले,नामदेवराव देसले बापू भामरे ,शिवाजी देसले,रविंद्र देसले (माजी सरपंच) प्राचार्य विकास देसले,दीपक काकूस्ते (पोलीस पाटील)मधुकर देसले,विठ्ठल चौधरी,किशोर देसले,राजुशेठ सोनवणे,पंडित काकूस्ते,भालचंद्र देसले,नाना देसले,गोटू आप्पा देसले,देविदास देवरे,आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध