Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

नेवाडे येथे जि.प.अध्यक्ष ना अश्विनी पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार



शिंदखेडा प्रतिनिधी : नेवाडे गावाची गत वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले जातील नेवाडे गावाने जिल्ह्यात केवळ राजकीय रतनेच नव्हे तर सर्वच आघाड्यांवर माणसं दिली आहेत शैक्षणिक उद्योग सामाजिक आघाडीवरील माणुसकीची रत्ने या गावात निर्माण झाली आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा अरविंद जाधव यांनी नेवाडे ता शिंदखेडा येथे केले.
     
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष नामदार सौ अश्विनी भूषण पाटील यांच्या नेवाळे ता शिंदखेडा ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन 2 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार रामकृष्ण पाटील होते यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ बांधकाम सभापती देवेंद्र पाटील महिला व बालकल्याण सभापती संजीवनी ताई सिसोदे, शिक्षण व आरोग्य सभापती महावीर सिंह रावल कृषी सभापती हर्षवर्धन दहिते माजी सभापती संग्राम दादा पाटील भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय शर्मा जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे डी आर पाटील वर्षी शिंदखेडा येथील उज्वल शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक अशोक विनायक पवार माजी सरपंच रमेश डोमन पवार ज्ञानेश्वर पवार रामदास खैरनार मुनीर पिंजारी माजी सरपंच सौ अनिता रमेश जाधव नेवाड्याचे सरपंच बाजार समिती संचालक मोतीलाल दोधा पाटील लक्ष्मीकांत साळुंखे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी प्रा अरविंद जाधव म्हणाले गेल्या 30 वर्षाच्या राजकीय आयुष्यात संघर्ष व मेहनतीचे फळ पक्षश्रेष्ठीनी दिले आहे ज्या पक्षात गेलो तिथे निष्ठेने काम केल्यामुळे माझ्या सुनेचे नाव जिल्हा परिषद अध्यक्ष साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन जिल्ह्याचे नेते आमदार अमरीश भाई पटेल व आमदार जयकुमार रावल आदींनी सुचवल्यामुळेच सेवेची संधी मिळाली असून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास करणे स्वच्छ पारदर्शक प्रमाणे कार्य करण्यात येईल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले नेवाडे गावाला सर्वच राजकीय पदे मिळाली आहेत फक्त नामदार होणे बाकी होते ती ही संधी नेवाड्याच्या सुनबाई अश्विनी पाटील च्या रूपाने मिळाल्याने समाधान व्यक्त केले नेवाडेतील जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी तोंड भरून कौतुक केले 
महिला व बालकल्याण सभापती सौ संजीवनी सिसोदे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे संजय शर्मा आदींनी मनोगत व्यक्त केले उज्वल रुरल डेव्हलपमेंट सोसायटीचे चेअरमन डॉक्टर आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उज्वल रुरल डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ विद्यालय शिंदखेडा तापी परिसर माध्यमिक विद्यालय नेवाडे तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध