Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान तर्फे दिवाळी भाऊबीज निमित्त ५०० निराधार भगिनिंना साड़ी चा आहेर वाटप
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान तर्फे दिवाळी भाऊबीज निमित्त ५०० निराधार भगिनिंना साड़ी चा आहेर वाटप
शिरपूर प्रतिनिधी:सविस्कमर वृत्त असे की - दिनांक ०३-११-२०२२ वार- गुरूवार रोजी सायंकाळी 6 वाजेला करवंद नाका परिसरात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य च्या वतीने आयोजित यंदा ची दिवाळी साजरी करूया गरीबांच्या दारी या सेवाभावी मोहिमे अंतर्गत दिवाळी व भाऊबीज निमित्त 12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार,गरजु व कोरोना काळात झालेल्या एकल विधवा भगिनिंना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष- विकास सेन,उपाध्यक्ष- श्रीरामचंद्र येशी, खजिनदार- कुलदीप राजपूत,सचिव हेमलता येशी यांच्या माध्यमातुन ५०० साड़ी चा आहेर वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी शिरपुर तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन, तर गटविकास अधिकारी संजय सोनवणे, पोलिस निरीक्षक रविन्द्र देशमुख,बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे,उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक ध्रुवराज वाघ,धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटिल, माझी.उपनगराधक्ष वासुदेव देवरे,मर्चेन्ट बैंकेचे चेअरमन प्रसन्न जैन नगरसेवक गणेश सावळे,अजंदे येथील सरपंच राजेंद्र पाटिल,पंचायत समिति सदस्य यतीश सोनवणे,लौकी येथील माझी.सरपंच भीमसिंग राजपूत,शिक्षण मंडळ डायरेक्टर सुरेश चौधरी,भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज,अ.भा.वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटिल,भामपुर येथील पोलिस पाटिल संभाजी बोरसे,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप येशी, सेवा निवृत्त केशियर रामचंद्र पवार,महा.नाभिक महामंडळ धुळे जिल्हा ज्येष्ठ सल्लागार भरत येशी,इंजिनियर भालचंद्र वाघ,
इंजिनियर पद्माकर शिरसाठ,भारत मंड़प अँड कैटरर्स चे संचालक जीवन चौधरी,
साँईसा प्रॉपर्टी ब्रोकर चे संचालक दिनेश ठाकुर,सुशांत एल.आय.सी सेवा चे संचालक किरण पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध कवि यशवंत निकवाड़े सर यांनी केले
कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध हास्य अभिनेता विजय पवार यांनी निराधार,गरजु व विधवा माता भगिनिंना आपल्या हास्य विनोदाच्या माध्यमातून भाऊबिज विषयावर संभोदित केले.
कार्यक्रमात ५०० हुन अधिक निराधार,गरजु व विधवा माता भगिनिंना उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते साड़ी चा आहेर जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांच्या वतीने अनेक प्रतिष्ठित व दानशूर नागरिकांच्या आर्थिक व वस्तु रूपाच्या अप्रतिम सहकार्याने देण्यात आले
अध्यक्ष स्थानी असलेले तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन म्हणाले की नावारुपात असलेल्या संस्था अनेक आहेत परंतु 12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार,गरजु व विधवा माता भागिनिंसाठी खऱ्या अर्थाने समाज सेवा करणारी एकमेव संस्था म्हणजेच जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान आहे.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी करवंद येथील विविध कार्यकारी सोसायटी चे सदस्य अशोक भाईदास पाटिल,जीवन चौधरी,नीतेश माहेश्वरी,प्रेमसिंग राऊळ,आदिंचे सहकार्य लाभले
विकास सेन व श्रीरामचंद्र येशी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर व दानशूर मंडळी यांचे आभार मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा