Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील पाच गावांच्या जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीने सिंचन विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबनार....



साक्री तालुक्यातील काटवान लाटीपाडा धरणाच्या उजव्या वाढीव कालवा याचे छाईल ते बेहेड दरम्यान रुंदीकरण, दुरुस्ती व पोटाचाऱ्या याच्या कामासाठी जल आक्रोश समिती गेल्या चार दशकांपासून पाठपुरावा करीत असतांना गेल्या वर्षभरात या मागणीस धार आली आहे व चार वेळा मोठे आंदोलने करण्यात आली परंतु ढिम्म यंत्रणा अपेक्षित गती घेत नसल्याने आता समितीने ऍड.युवराज तोरवणे, मुंबई यांच्यामार्फत सिंचन विभागातील अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा 2006 व अभिलेख व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा म्हणुन धुळे पोलीस अधीक्षक व गृह विभाग मंत्रालय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. समिती या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल करण्याच्या पुर्वतयारीत असुन कागदपत्रांची व कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याचे काम सुरु आहे. गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारींवर धुळे जिल्हाधिकारी यांनी अधीक्षक अभियंता यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता विभाग खडबडून जागा झाला असुन कार्यकारी संचालक, तापी महामंडळ जळगाव यांनी समितीबरोबर पुढच्या आठवड्यात बैठक बोलावली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध