Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील युवकांना म्हणजेच अनुकंप उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित केली
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील युवकांना म्हणजेच अनुकंप उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित केली
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये राज्यभरात 75 हजार उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्याचा आज शुभारंभ होत असून नाशिक विभागात 456 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यात पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, उपायुक्त (महसूल) उन्मेष महाजन, एस.टी.महामंडळाचे प्रादेशिक उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद व अधिकारी, कर्मचारी व उमेदवार उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचार व कार्यातून समाजाच्या उन्नतीसाठी रयतेच्या पोटा पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचा सांगितले आहे. या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत राज्यात 75 हजार तरुणांच्या हाताला काम देण्याचे ठरवले. आज नाशिक विभागातून 456 तरुणांना रोजगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यासाठी आजचा शुभदिवस असल्याचे पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.
आज देण्यात आलेल्या नियुक्त्या मध्ये राज्य परिवहन विभाग, वीज वितरण कंपनी, नगरपालिका या विभागात उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या. वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहायक म्हणून महिलांना नियुक्ती देण्यात आली असून यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. नवनियुक्त उमेदवारांनी चांगली सेवा देऊन व्यसनापासून लांब रहावे, अशी सूचना ही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी केली. तसेच येत्या काळात आपण सर्वजण समन्वयाने काम करुन नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहूया असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये राज्यभरात 75 हजार उमेदवारांना रोजगार देण्याचा शासनाचा मानस असून तरुणांच्या हाताला काम मिळाल्याने नक्कीच तरुणांना भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी उभारी मिळणार आहे. शासनाने कमी कलावधीत अत्यंत महत्वपूर्ण व निर्णय चांगले निर्णय घेवून प्रशासन गतीमान केले आहे, असे मत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत 75 हजार उमेदवारांना रोजगार देणारा असून या महासंकल्पाची सुरुवात आज झाली आहे. नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवार जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी आजपासून कटीबद्ध झाले आहेत. उमेदवारांनी चांगली सेवा देवून योगदान द्यावे. तसेच विद्युत सहायक या पदावर महिलांना नियुक्ती देवून खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमतेचा गौरव केला असल्याची भावना आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा