Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

ई-हक्क आज्ञावली बाबत कार्यशाळा संपन्न ई-हक्क प्रणालीचा नागरीकांनी वापर करावा जिल्हाधिकारी मनीषा खत्री



नंदुरबार, प्रतिनिधी दि16: जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणीकृत दस्तवगळता इतर फेरफार जसे वारस फेरफार, इतर हक्कातील नावे कमी करणे, अज्ञान पालनकर्त्यांचे नावे कमी करणे, मयताची नावे कमी करण्याबरोबरच संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली शासनाने विकसित केली असून या प्रणालीचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत ई-हक्क व ई-चावडी आज्ञावलीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेस सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार श्रीमती.सरीता नरके, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री म्हणाल्या की,नागरिकांना नोंदणीकृत दस्तवगळता इतर फेरफार, इतर हक्कातील नावे कमी करणे, अज्ञान पालनकर्त्यांचे नावे कमी करणे, मयताची नावे कमी करण्याबरोबरच संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्तीसाठी महसुल विभागामार्फत ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आली असून ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यासाठी http://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx  या संकेतस्थळावर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज व कागदपत्रे दाखल करता येईल. तरी नागरिकांनी या नवीन प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अपर जिल्हाधिकारी श्रीमती.नरके म्हणाल्या की, ई-चावडी प्रकल्पातंर्गत ई-चावडी प्रणाली विकसित करण्याचे काम शासनस्तरावर सुरु आहे.यामुळे अष्टसुत्री कामकाज पुर्ण असणाऱ्या गावांचा समावेश ई-चावडी प्रकल्पात तात्काळ करता येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रथम भाग अद्यावतीकरण पूर्ण असणारी गावे निश्चित करणे आवश्यक आहे.जेणे करुन प्रत्येक जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प कार्यान्वित करता येईल असे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-चावडी,ई-फेरफर व नव्याने विकसित ई-हक्क आज्ञावलीची माहिती दिली. प्रशिक्षणास सर्व तहसिलदार,नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी,तलाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध