Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

ज्ञानाचा अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !




शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे होते. सुरुवातीला डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक अमोल सोनवणे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे यांनी विद्यार्थी जीवनापासून बाबासाहेबांनी घेतलेली मेहनत व उच्च शिक्षण घेऊन घटनेचे शिल्पकार पर्यंतचा प्रवास याबद्दल सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे.पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती एस.आर.जाधव यांनी मानले.
 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.बी.धायबर, अमोल सोनवणे,हितेंद्र देसले,ए.जे .पाटील,डी.एम.पवार,श्रीमती एस.आर .निकम,श्रीमती मनीषा पाटील,श्रीमती सीमा जाधव ,पी.एस.अटकाळे,बी.एस. पावरा,बी.एस.बडगुजर,युवराज मीठभाकरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध