Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ डिसेंबर, २०२२
पी.एम.बायोटेकचे जिवाणू व खते आणि जैविक औषधे हाच आपल्या शाश्वत शेतीचा आत्मा आहे
नमस्कार ,शेतकरी मित्रानो पी एम बायोटेक कडून शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करीत आहे
आपल्या शेतीजमिनीत
कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात.
आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो,जिवाणूंची संख्या एक मूठभर मातीत 10 कोटी पेक्षा जास्त असते त्यात 70 /80 प्रकारचे जिवाणू असतात.
ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे,
ज्या जमिनीचा EC 0.5 च्या आत आहे,
ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे
ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत, कि ज्यावर आपल्या जमिनीची सुपीकता, आणि उत्पादकता अवलंबून असते.आपण शेतीतून उत्पन्न घेतो, ज्याकाही पिकांचे आपण उत्पन्न घेतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 16 अन्न घटकांची आवश्यकता असते.
पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 गट केलेले आहेत. त्याची माहिती गेल्या 15/20 दिवसापासून आपण घेत आहोत.
(1)
नैसर्गिक अन्न घटक = 3 ;
1 कार्बन 2 हैड्रोजन 3 प्राणवायु
हे घटक नैसर्गिक रित्या हवा पाणी सूर्यप्रकाश यांच्या पासून उपलब्ध होतात.
(2) मुख्य अन्न द्रव्ये - एकूण 3
1 नत्र 2 स्फुरद 3 पालाश.
प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.
(3)
दुय्यम अन्न द्रव्य = 3;
1 कैल्शियम 2 मैग्नेशियम 3 गंधक.
मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागतत् म्हणून म्हणून यांना दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.
(4) सूक्ष्म अन्नद्रव्ये
सूक्ष्म अन्न द्रव्ये = 7;
1 फेरस = लोह, 2 झींक = जस्त, 3 कॉपर = तांबे , 4 मंगेनिज, 5 मोलाब्द , 6 बोरॉन, 7 निकेल
ही 7 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात ,म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.
वरील 1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकास मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये या तिन्ही अन्न द्रव्यांच्या बाबतीत लक्ष्य द्यावे लागते. हे 13 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये जमिनीला पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास "अपटेक्" "शोषण" करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास "स्थिर स्वरूप"किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास "अपटेक्" करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागतत्. हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल *जीवाणु* करीत असतात. ह्या विविध प्राकारच्या जीवाणुंची 'संख्या आणि कार्यक्षमता' ही अत्यंत महत्वाची असते. या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे.वर्षानु वर्ष सातत्याने होणारा रासायनिक खतांचा मारा याला कारणीभूत आहे सरसरी 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी जैविक सेंद्रिय कर्ब द्यावा लागतो. जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.
पी एम बायोटेकचे जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, इ ,जीवामृत स्लरी,ऍझो, लरायझो, पीएसबी हि जैविक खतेच आहेत, स्वस्त आणि कमी खर्चात ती देता येतात.यामुळे पी एम बायोटेकचा जैविक खतामुळेच किंवा जीवणूमुळेच आपल्याला उत्पन्न मिळते आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न कमी मिळते.
याचे एक उदाहरण देतो ज्या जमिनीची लेव्हल केलेली असते त्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळतच नाही, कारण जसे दूध तापवून थंड झाल्यावर त्याला साय येते, म्हणजे साय हा दुधाचा पौष्टीक पदार्थ असतो, तसे जमिनीत वरचा 1 विथचा जो थर असतो तो म्हणजे जमिनीचा पौस्टिक पदार्थ असतो, त्यातच सर्व प्रकाचे जिवाणू असतात आणि हाच 1 विथ जमिनीचा थर लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो व जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो .रासायनिक पदार्थ ,सेंद्रिय कर्ब यांचा झाडाला पुरवठा करणारे जिवाणू उपलब्ध नसल्यामुळे ते पदार्थ झाडाला ,पिकांना मिळत नाहीत आणि म्हणून लेव्हल केलेल्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळत नाही 2/3 वर्षानंतर नैसर्गिक रित्या पालापाचोळा सडून तण व वेगवेगळ्या झाडाझुडपाचा काडीकचरा त्यांचे कास्ट या पासून ह्युमस तयार होतो व त्यापासून सेंद्रिय कर्ब ,त्यात जिवाणूंची वाढ झाली की अशा लेव्हल केलेल्या जमिनीतून उत्पन्न मिळायला लागते.
मित्रानो वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे जमिनीतून उत्पन्न मिळते ते फक्त आणि फक्त जीवणूमुळेच मिळते, आणि म्हणूनच पी एम बायोटेक चा जैविक खतांचा वापर वाढवा उत्पन्न आपोआप वाढेल.
फुकटचे वेस्ट डी कंपोझर विरजण, इ एम जिवाणू आणि इतर जैविक खतांच्या वापर आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करा.
आज मी ज्या 3/4 पोस्ट ग्रुप वर पोस्ट करीत आहे,त्या समजून घ्या व ह्या वर्षी रासायनिक खतांची मात्रा निम्मेने कमी करा आणि सेंद्रिय खते व जिवाणूंचा वापर वाढवा, तुमचे शेती उत्पन्न 30 % पेक्षा जास्त वाढेल हे मी खात्रीने सांगतो.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा