Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी केली जातेय, काही राज्यं समान नागरी कायदा लागू करतायत.अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं विधान केलंय.राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असं विधान फडणवीसांनी केलंय,त्यामुळे राज्यात समान नागरी कायद्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.
समान नागरी कायदाअस्तित्वात असलेलं सध्या देशात गोवा हे एकमेव राज्य आहे.आता उत्तराखंडमध्येही समान नागरी कायदा लागू होतोय.पण हा कायदा आल्यानं नेमकं काय होईल पाहुयात..
समान नागरी कायद्यामुळे काय होईल?
सध्या प्रत्येक धर्मासाठी विवाह, संपत्ती याबाबत स्वतंत्र कायदा
सर्व धर्मांना विवाह, घटस्फोट, मालमत्ता, दत्तक यासाठी एकच कायदा लागू होईल
आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही
विवाह आणि संपत्तीसाठी सर्वधर्मीयांसाठी एकच नियम
राज ठाकरे यांचा पाठिंबा
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही समान नागरी कायद्याला जाहीर पाठिंबा दर्शवलाय.एका राज्यासाठी समान नागरी कायदा नसतो,ते केंद्र ठरवतं आणि तो संपूर्णपणे देशात येतो,आणि तो आला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
समान नागरी कायदा हा भाजप-संघाच्या अजेंड्यावर अनेक दशकं आहे.भाजपशासित राज्यात हा कायदा लागू करण्यासंबंधी हालचाली सुरु झाल्यात.त्याचवेळी केंद्राकडून सर्वच राज्यांसाठी हा कायदा आणला जाऊ शकतो.त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा