Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.



सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या,विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या लोकांनी तिला नजरकैदेत ठेवले होते. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केली होती.जुना नवसात मोहल्ला,पाल ब्रिज,
उमरागाम सुरत येथील रहिवासी विवाहित महिलेने आत्महत्या केल्याप्रकरणी माहेरचाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयताच्या सासरच्यां लोकांच्या विरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व चुलत सासऱ्यांनी तिला घरात ओलीस ठेवले,शिवाय घरासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली.या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

(चुलत सासरा) ( सुनील गुलाबराव पानटील)

बस्तीमल आत्माराम वानखेडे हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गणपूर गावचे रहिवासी आहेत.वानखेडे हे शेतकरी आहेत.त्यांची मुलगी भारती हिचा विवाह 26 मे 2022 रोजी सचिन पानपाटील याच्याशी झाला.लग्नानंतर महिनाभरानंतर पती सचिन आणि चुलत सासरा सुनील गुलाबराव पानपाटील यांनी तिच्याकडे सुरत येथे घर घेण्यासाठी १० लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली.

याशिवाय तिच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरात ओलीस ठेवले.या छळाला कंटाळून विवाहितेने बुधवार दि.28 सप्टेंबर रोजी सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी मयत भारती चे वडील बस्तीमल यांनी उमरागाम सुरत पोलीस ठाण्यात पती सचिन व चुलत सासरे सुनील पानपाटील यांच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला.उमरागाम पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचा पती सचिन विजय पान पाटील यांना अटक केली असून चुलत सासरा सुनील गुलाबराव पानटील हे नंदुरबार येथे कोरीट रोड बन्सीलाल नगर येथे राहत असून ते फरार झालेले आहेत.याबाबत पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला आहे.

असे असले तरी मृत विवाहितेचे चुलत सासरे सुनील पानपाटील हे घटना घडलेल्या दिवसापासून तब्बल तीन महिने होऊन देखील पोलिसांच्या हाती का लागत नाही ? असा प्रश्न मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्र प्रतिनिधी कडे केला आहे.
याबाबत त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.तरी उमरागाम सुरत पोलिसांनी फरार आरोपीचा कसून तपास करून त्याला जेरबंद करावे अशी मृत महिलेच्या आई-वडिलांची तळमळीची मागणी आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध