Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ डिसेंबर, २०२२

सचखंड गुरुद्वारा भेट आणि नांदेडच्या नानक साई टीमच्या पाहुणचाराने धन्य झालो - राजकुमार चौगुले



नांदेड प्रतिनिधी:येथिल जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वाराची भेट आणि नांदेडच्या नानक साई टीमच्या पाहुणचाराने आम्ही धन्य झालो असे प्रतिपादन कोल्हापूर येथील जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे पश्चिम महाराष्ट्रा विभागाचे प्रमुख राजकुमार चौगुले यांनी केले आहे.

जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे पश्चिम महाराष्ट्रा विभागाचे प्रमुख राजकुमर चौगुले हे नुकतेच नांदेड येथे आले होते.नानक साई फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा नांदेड येथिल हॉटेल अतिथी मध्ये स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान त्यांनी जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिब चे मनोभावे दर्शन घेतले.गुरुद्वारा ची भेट आणि दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो अशी भावना चौगुले यांनी व्यक्त केली. नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या हस्ते चौगुले कुटुंबातील सर्व सदस्यांचा यथोचित सम्मान करण्यात आला. शिरड शहापूर येथे जाऊन त्यांनी जैन मुनी संत विद्यासागर जी यांचे दर्शन घेतले.

जेष्ठ पत्रकार राजकुमार चौगुले यांचे सुपुत्र ऋग्वेद चौगुले यांचा याच दरम्यान वाढदिवस होता, वाढदिवसाच्या निमि त्ताने ऋग्वेद ला शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. 

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता बळीराम सुकरे, घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन देवकर,गोपाल पेंडकर, तुकाराम कोटूरवार, प्रा.राजेश मुखेडकर, श्रेयस कुमार बोकारे, बालाजी ढगे, जयप्रकाश नागला, धनंजय उमरीकर, चंद्रकांत पवार

उपस्थिती राहिले असते.

नानक साई फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिनाच्या अवचित्याने नांदेड ते अमृतसर अशी घुम न यात्रा आयोजित केली जाते, या यात्रे मार्फत दोन राज्यात बंधुभाव निर्माण होण्यात महत्वाची भूमिका ठरत आहे याबद्दल चौगुले यांनी समाधान व्यक्त करत यावेळी कोल्हापूर विभागातुन मोठया संख्येने भाविक सहभागी होणार असल्याचे सांगितले.शेवटी घुमान यात्रेचे कार्यवाह श्रेयस कुमार बोकारे यांनी आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध