Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

लोकनियुक्त सरपंच व सामाजिक महिला कार्यकर्त्या सुषमाताई वासुदेव पाटील यांनी आपला वाढदिवस मूकबधिर विद्यालय विद्यार्थ्यांच्या सहवासात केला साजरा..!





अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी रक्तात असावी लागते, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच व सामाजिक महिला कार्यकर्त्या सुषमाताई वासुदेव पाटील यांनी आपला वाढदिवस मूकबधिर विद्यालय विद्यार्थ्यांच्या सहवासात त्यांना मिष्टान्न जेवन देत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करत त्यांना फेटे बांधून वाढदिवस साजरा केला.

कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थ्यांच्या सहवासात जाऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला नमूद प्रसंगी मुकबधिर विद्यार्थी बांधवांच्या निवासस्थानी रंग
रंगोटी करून भिंत सचित्र केल्या व वस्तीगृह अद्यावत करण्याचा छोटासा प्रयत्न केला,तसेच नमुद दिव्यांग सर्व विद्यार्थ्यांना व फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन व त्यांच्यासोबत सुरुची भोजन परिवारासह घेतले दिव्यांग विद्यार्थी यांचे निरीक्षण क्षमता वाढून तिचा विकास व्हावा व त्यांना आनंद प्राप्त व्हावा या करिता जादुई प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुषमाताई पाटील यांना दिवसभरातून त्यांना भ्रमणध्वनीवर,सोशल मीडियावर अनेक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,
धार्मिक,सांस्कृतिक,कृषी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.त्या म्हणाल्या की आपण दिलेल्या शुभेच्छा नेहमी मला सामाजिक कार्याला प्रेरणादायी ठरतील व आपल्या आशीर्वाद असाच नेहमीच माझ्या पाठीशी राहू द्यावा असे त्यांनी बोलतांना सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध