Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

राज्यपाल आणि त्रीवेदीची हकालपट्टी झालीच पाहिजे – उदयनराजे भोसले* *शिवरायांचा खरा इतिहास शासनाकडून प्रसिद्ध झाला नाही हे दुर्दैव,विकृत लोकांच्या तावडीत देश गेलाय



राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप चा नेता त्रिवेदी यांनी छ.शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद भाष्य केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज खासदार उदयनराजे भोसले यांनी किल्ले रायगडाला भेट देत महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत शिवसन्मान आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अन्यथा आझाद मैदानावर एल्गार करणार असल्याचा निर्धार किल्ले रायगडावरून दिला.  
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीवर केंद्र किंवा भाजप कडून प्रतिसाद न मिळाल्याने उदयनराजेंनी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा हे आंदोलन केले. शेकडोंच्या संख्येने उदयनराजे भोसले रायगडावर दाखल झाले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करून राजसदरेवर काही काळ ते आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाला बसले होते. त्यानंतर त्यांनी राजसदरेवरून आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी उदयनराजे महाड मध्ये दाखल झाले त्यांनी छ.शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर छत्रपती उदयनराजे रोपवेने रायगडावर पोहोचले. त्यांनी पहिल्यादा शिरकाई देवीचे दर्शन घेतले. होळीचा माळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला अभिवादन केले. त्याआधी उदयनराजेंनी राजमाता जिजाईंच्या समाधीचं पाचाडमध्ये दर्शन घेतले. शनिवारी उदयनराजे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गडावर दाखल झाले. 
राजसदरेवरून उदयनराजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कांही जण जाणीवपूर्वक देशात युगपुरुषांच्या प्रतिमेचा अवमान करत आहेत. महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि  महाराजांचा अपमान सहन करणंही चूक आहे असे सांगून सर्वधर्मसमभावाचा विसर पडल्यास देशाची फाळणी उघड असल्याचा धोका देखील उदयनराजे यांनी व्यक्त केला. महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यास देश फुटला म्हणून समजा, अशी भीती उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झालाय. महाराजांच नाव घेतात पण विचार मात्र विसरतात. यामुळे 'देशाचे ३० तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. 'स्वार्थी, व्यक्तिकेंद्री राजकारण झाले आहे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन उदयनराजे यांनी सर्व राजकीय नेत्यांना टोला लगावला. महाराजांच्या अपमानावरुन पांघरुण घालताना लाज वाटली पाहिजे. राज्यापाल पदावरुन महापुरुषांचा अपमान आणि खिल्ली उडवत असताना आपण पाहात बसलो आहोत? महाराजांचा अपमान आपला सर्वांचा अपमान आहे. विकृत लोकांच्या तावडीत देश गेलाय. पदावर बसलेले लोक रयतेमुळे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अपमान झाल्यावर गप्प बसले, नीतीमत्ता गेली कुठे?, 'चूक ती चूक पांघरुण घालणाऱ्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी नकळत भाजप आणि राज्यातील सत्ताधारी लोकांना दिला. राज्यपालपदावरून कोश्यारींना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्याने उदयनराजे यावेळी संतापले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध