Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

चवदार तळे.....मंदीर प्रवेश.....


             हेमंत मुसरीफ पुणे. 
               9730306996.

स्पृश्यास्पृश्य भेद
मानत होते खुळे
प्रस्थापीत जाळ्यां
फसत होते भोळे

आंदोलन बाबांचे
महाडचवदार तळे
पाणी सर्वां समान
रहस्य खरेचं कळे

असह्य तो अन्याय
साहेब ही तळमळे
साखळीमुक्त  सारे 
झाले  डाॅक्टरांमुळे

दीनदलीतकाळजी
काळीज  तव जळे
निलसूर्य लखलख
आता भाग्य उजळे

तेव्हा लावले रोपटे
आता मिळती फळे
सोसल्या त्या झळा
फुलले  सुंदर  मळे

प्रकाश खुले सर्वत्र 
दिवस सरले काळे
धन्य रे महामानवा
हातआपसूक जुळे

महूस्थान चैत्यभूमी
रक्तधमन्या सळाळे
तुझा विचार  सुगंध
आसमंतात दळाळे

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.


2 मंदीर प्रवेश.....

स्पृश्या स्पृश्य  भेद
मानत  होते   खुळे
प्रस्थापीतांचे जाळे
फसत चाललेभोळे

मंदिरप्रवेश न सर्वां
लावलेजायचे टाळे
अलिखितहे कायदे 
अगदी कभिन्नकाळे

असूनि सारीमाणसे 
रे देव देवतांची मुले
निषिद्ध  माने काही
सुंदर  गोजीरी फुले

डाॅक्टरांचासत्याग्रह 
गळूनि पाडले  टाळे
मंदीर  सकला खुले
झाले बाबांच्या मुळे

विषारी वृक्षाची त्या
उपटून टाकली मुळे
प्रकाश पसरे  सर्वत्र 
दिवस  सरले  काळे

बौद्धधम्म स्थापिला
अहो सभाग्य उजळे
नीळा सूर्य इतिहासा
सदासर्वदा  झळाळे

शतधन्य महामानव
हात आपसूक जुळे
मुक्त भेदभेदा मधून 
महत्व  आत्ता  कळे

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध