Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

चोपडा तालुक्यातील उमर्टी ग्रामपंचायत येथील प्रकार ग्रामसेवकाने केली माहिती अधिकाराची पायमल्ली...!




चोपडा प्रतिनिधी -चोपडा तालुक्यातील उमर्टी ग्रामपंचायत माहिती अधिकार कार्यकर्ते सुनिल पावरा यांनी दोन ऑगस्ट 2022 ला माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली परंतु चार महिने उटूनही एक साधा पत्र व्यवहार सुद्धा ग्रामसेवक वासुदेव रामसिंग पारधी यांनी केलेला नाही प्रथम अपिल सुनावणी वेळी गट विकास अधिकारी भरत साहेबराव कासोदे तसेच ग्रामसेवक वासुदेव रामसिंग पारधी व अपिलार्थी सुनिल पावरा हे उपस्थित होते यांच्या समक्ष आठ दिवसात विनामूल्य माहिती उपलब्ध करून देतो असे त्यावेळी ग्रामसेवकांनी सांगितले परंतु कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप मिळाली नाही यामुळे राज्य माहिती आयोग नाशिक ला दुसरे अपील सुनिल पावरा यांनी पाठविले व माहिती अधिकाराची पायमल्ली का ? होत आहे. 

याची खंत व्यक्त केली चोपडा तालुक्यातील बहुतेक ग्रामीण भागात कोणत्याच गोष्टी वेळेवर होतांना दिसत नाही.वेळी अवेळी ग्रामसेवक येणे, हालचाल रजिस्टर न ठेवणे,
ग्रामपंचायत कार्यालयात दफ्तर न ठेवणे ,घरी घेवुन जाणे,हिशोब विचारल्यास उडवा उडविचे उत्तरे देणे, सभेत महिला सदस्य यांच्या पतींची मनमानी व्यवहार चालणे ,अश्या प्रकारची तक्रार शिक्षित युवा पिढी व जेष्ठ नागरिकांकडून होत आहे लोकांना त्यांच्या अधिकाराविषयी जाणीव केव्हा होईल याची खंत सुनिल पावरा यांनी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध