Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरात मेन रोड वरील अतिक्रमणाबाबत शिरपूर शहर पो.नि.व व्यापारी असोसिएशन यांची समन्वय बैठक संपन्न...!
शिरपूर शहरात मेन रोड वरील अतिक्रमणाबाबत शिरपूर शहर पो.नि.व व्यापारी असोसिएशन यांची समन्वय बैठक संपन्न...!
शिरपूर शहरातील बस स्टॅन्ड ते कन्या स्कूल हा परिसर मेन रोड म्हणून ओळखला जातो मात्र मागील काही काळान पासून नगर परिषदेने या मेन रोड वरील अतिक्रमणाबाबत सोयीची भूमिका घेतल्याने मेन रोडवर अतिक्रमणाच्या विळखा हा दिवसेंदिवस वाढत होता.
काही दिवसांपासून शहर पोलिसांनी सदरच्या विषयी गांभीर्याने घेत लोकांना शिस्त लागावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलत मेन रोड वरील अतिक्रमणाविरोधात मोहीम हाती घेतली. या मोहिमेचे शहरातील सर्वच नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून काही दिवसांपासून मेन रोडच्या श्वास मोकळा झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मात्र सदरची कारवाई करत असताना मेन रोडवर गाडी लावून भाजीपाला विक्री करणारे व इतर उपजीविका करणारे लोकांच्या मात्र रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला. शिवाय मेन रोडवर अनेक मोठे व्यापारी असल्याने त्यांच्या मालवाहू गाड्या रोडवर उभे राहिल्यास रहदारीस अडथळा निर्माण होतो.
या सर्व कारणास्तव शहरातील व्यापारी व किरकोळ विक्रेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी व चर्चेतून इतर समस्या सोडवण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पी.आय. आगरकर यांनी काल सायंकाळी शहरातील पाताळेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये एक संयुक्त मिटींगचे आयोजन केले होते. यात मोठ्या प्रमाणावर व्यापारी व किरकोळ व्यापारी उपस्थित होते. सदरच्या बैठकीत व्यापारी असोसिएशन कडून नवनियुक्त पीआय यांचे स्वागत करण्यात आले. पीआय आगरकर यांनी देखील आपली भूमिका मांडताना अतिक्रमण काढणे ही जबाबदारी पोलिसांची नसून ती जबाबदारी नगर परिषदेची आहे.मात्र मेन रोडवर विविध शालेय विद्यार्थी, हॉस्पिटल ला जाणाऱ्या गाड्या, व वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असल्याने सदरची कारवाई ही जनहितात हाती घेण्यात आली आहे. यातून कोणावर कारवाई करणे हा उद्देश नसून जनतेच्या समस्या सोडवणे व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांना शिस्त लागून नियमांची जाणीव राहील व व मेन रोडवरील अडथळा दूर करण्यास देखील मदत होणार आहे. व्यापारी बांधवांनी देखील मेन रोडवरील आपल्या ग्राहकांमुळे कोणतीही गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी,आपल्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, व आपल्या बाहेर गावाहून येणाऱ्या मालवाहू गाड्यांसाठी सकाळी ८वाजेच्या आत व रात्री 10 नंतर ची वेळ ठरवून कामे करावीत जेणेकरून जनतेस अडचण निर्माण होणार नाही.
यावेळेस शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी देखील आमच्या पोटा पाण्याच्या प्रश्न आहे, आमच्या उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो, व्यवसाय बंद झाल्याने आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड उभी राहिली आहे त्यामुळे आमच्या देखील सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर पोलीस निरीक्षक यांनी आमच्या तुमच्या व्यवसायास विरोध नसून फक्त मेन रोडवर अतिक्रमण करू नका इतकाच विषय आहे या व्यतिरिक्त तुम्ही इतर ठिकाणी शिस्तीने व्यवसाय करण्यास हरकत नाही. शिवाय आपला प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन यांच्याशी चर्चा करून शहरात एक होकर्स झोन निर्माण करून एकाच ठिकाणी सर्व होकर्स वाले यांनी जमवून जर व्यवसाय केला तर आपला व्यवसाय ही होईल व नागरिकांना देखील सोयीचे होईल अशा पद्धतीने उपाय योजना करण्याबाबत आश्वासित केले.
शिरपूर शहरात हॉकर्स निर्माण करून व्यवसायास जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यापूर्वी देखील नगर परिषदेकडे वारंवार करण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत नगरपरिषदेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने शहरातील मेन रोडवरील अतिक्रमणाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत होती. पुढील काळात नगरपरिषद व पोलीस प्रशासन मिळून यातून काही मार्ग काढून उपायोजना केल्यास भविष्यात मेन रोडवरील अतिक्रमण व बेशिस्त वाहने यांच्यावर वचक बसण्यास मदत होणार आहे.
सदस्य बैठकीतून व्यापारी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून एक वेळ निश्चित करून मोठी वाहने मेन रोडवर आणली जातील व माल खाली करण्याचे काम केले जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनास दिले आहे.
पोलिसांकडून राबवण्यात आलेला मोहिमेस नगरपालिकेकडून देखील सहकार्य मिळून ही मोहीम अशीच अविरत सुरू राहावी अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा