Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

काय बी हो माले राजकारण कराण शे , झोपडामा रासू ,एकच मत लेसू,पण मी इलेक्शन लढसू....हवश्या-गौशां-नवश्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल....





काहीही झाले तरी मला निवडणूक लढवायचीच,समोरच्याची जिरवायचीच ! जणू काहीसा असा निर्धारच करून यंदा अनेक जण निवडणुकीत उतरलेले दिसून येत आहेत.यात हवस्या - नवश्या व गौशांसह ओढून ताणूनही उमेदवार उभे केले - असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल १२२ उमेदवार सरपंच पदासाठी आपले भविष्य आजमावत आहेत, तर ६७४ उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात उतरले आहेत.

थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होत असल्याने सरपंच पदासाठी उमेदवारांची संख्या ही अधिक दिसून येत आहे.सरपंच पदाच्या सरासरी एका जागेसाठी तिन ते चार उमेदवार उभे असल्याने निवडणुकीत मोठी चुरस होणार असल्याचे चित्र दिसून येत असले तरी खरे चित्र मात्र अर्ज छाननी व माघारी नंतरच कळेल.तालुक्यातील काही गावांमधील मागील सत्ताधाऱ्यांनी गाव विकासासाठी चांगल्या प्रकारे कामे केले असून सदर पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांनी पॅनल उभे केले आहेत.तर विरोधात आजी-माजी सरपंच सरपंचांनीही पॅनल दिले असल्याने दोघं पॅनल प्रमुखांकडून आपल्या कार्यकाळात केलेला विकास कामाचा वापर प्रचारासाठी करण्यात येणार आहे.

त्यातच अनेक ठिकाणी हवस्या - नवश्या व गौशांची तर बऱ्याच ठिकाणी ओढून ताणून उमेदवार उभे केले असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.एकंदरीत आपले ध्येय गाठण्यासाठी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचे चित्र तालुक्यातील राजकारणात दिसून येत आहे.यालाच आपल्या खानदेशात म्हटलं जातं काय बी हो मले राजकारण कराण,शे झोपडामा रासू,एकच मत लेसू,पण मी इलेक्शन लढसू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध