Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागात खुर्चीनाट्य; एकाच खुर्चीवर दोन अभियंते, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम, कुणाचा झेंडा घेऊ हाती...!
धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागात खुर्चीनाट्य; एकाच खुर्चीवर दोन अभियंते, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम, कुणाचा झेंडा घेऊ हाती...!
धुळे प्रतिनिधी : धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आणि अभियंता रवींद्र पाटील यांच्यात बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पदावरुन चांगलेच खुर्ची नाट्य रंगले असल्याचे आज बघायला मिळाले.दोन दिवसांपूर्वी झालेल्या बदलीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) स्थगिती मिळवून घुगरी ह्या आज पुन्हा त्यांच्या मूळ पदावर रुजू झाल्या होत्या.तर, त्याआधी त्यांच्या जागी अभियंता आर. आर.पाटील हे आसनस्थ होते.यामुळे एकाच दालनात दोन अधिकारी कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असल्याने बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला.मूळ अधिकारी कोण,कोणाच्या आदेशांचे पालन करावे,असा प्रश्न कर्मचार्यांना पडला.येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्यांनी कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यांची बदली न झाल्यास लेखणीबंदचा इशारा देण्यात आला होता.त्यानंतर वर्षा घुगरी यांची बदली धुळे महापालिकेच्या आस्थापनात करण्यात आली होती. त्यानंतर त्या जागेवर अभियंता आर.आर.पाटील यांची नियुक्ती झाली होती.यामुळे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्विकारला. मात्र,घुगरी यांनी त्यांच्या बदलीविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. तिथे सुनावणी होऊन त्यांच्या बदलीस स्थगिती मिळाली. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या मूळ पदावर हजर झाल्या. यावेळी त्यांनी बदलीच्या स्थगिती संदर्भातील आदेशाची प्रत अभियंता पाटील यांना देऊ केली. मात्र, त्यांनी ती प्रत स्वीकारली नाही. पाटील यांनीही घुगरी यांच्याच दालनात शेजारी एक टेबल आणि खुर्ची टाकून कामकाज केले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. दिवसभर हा गोंधळ सुरू होता.
मला येथे दोन वर्षे सहा महिने झाले आहेत.नियमानुसार माझी बदली झाली नसून त्याला मी मॅटमध्ये आव्हान दिले. त्यानुसार मला मॅट कोर्टाने दिलासा दिला आहे.जर माझ्या कर्मचाऱ्यांना माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर ते प्रकरण आम्ही बसून सोडवू करू. त्यांची काही नाराजी असेल तर मी त्यांची माफी मागते.त्यांनी माझ्यासोबत असे का केलं याचं मला खूप दुःख आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.मी इथला नाही.मला वरुन आदेश आला,त्यानुसार मी या पदावर रुजू झालो.मी इथला नसून मी येथे राहत नाही.मी संगमनेरला होतो.मला काहीच माहीत नाही.पद्भाराबाबत मी काहीच सांगू शकत नाही.आता मी इथे बसलो आहे,अशी प्रतिक्रिया आर.आर.पाटील यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा