Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३
साक्रीचा सि.गो.पाटील महाविद्यालयातील सात छात्रसैनिक अग्निवीर मध्ये पात्र
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या काळात विद्या विकास मंडळाच्या सि गो पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील सात छात्र सैनिक भारतीय सेनेत अग्नीवीर सैनिक म्हणून यशस्वीरित्या भरती झाले आहेत.
केंद्र शासनाने अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय सेनेच्या तीनही दलांकरिता देशपातळीवर भरती प्रक्रिया राबविली होती.मुंबई येथील आर्मी भरती कार्यालयाकडून आयोजित केलेल्या सैनिक भरती प्रक्रियेत ४८ महाराष्ट्र बटालियन व महाविद्यालयातील एनसीसी विभागातील या सात छात्र सैनिकांची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे हे तरुण सर्वसामान्य कुटुंबातील शेतीकाम व एनसीसी चे प्रशिक्षण घेणारे आहेत.हल्ली बेरोजगारीच्या काळात तरुणांचा कल हा पोलीस भरती किंवा सैन्य दलात भरती होण्याकडे जास्त असतो.यासाठी विविध परीक्षांसोबत शारीरिक कसरती करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.
या सर्व प्रक्रियेत तरुणांना महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी अधिक मार्गदर्शक ठरते.भरती झालेल्या छात्र सैनिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) गौरव कलाल,फर्स्ट एसटीसी सिग्नल जबलपूर
2) निलेश जाधव,आर्टिलरी हैदराबाद
3) कृष्णा ठाकरे,आर्टिलरी हैदराबाद
4) भुषण सावळे,मराठा लाईट बेळगाव
5) मनोज महाले, अहमदनगर
6) शरद अहिरे,महार रेजिमेंट
7) भुषण अहिरे,अहमदनगर
सदर तरुणांची देशसेवेसाठी निवड झाल्यामुळे महाविद्यालय,त्यांचे कुटुंब व गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झालेल्या महाविद्यालयातील छात्रसैनिकांना ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पराग कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, कॅप्टन पी एन शिंदे व एनसीसी अधिकारी डॉ.भुषण अहिरराव यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच निवड झालेल्या छात्रसैनिकांचे विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा सौ मंगलाताई पाटील, उपाध्यक्ष श्री चंद्रजीत पाटील यांनी अभिनंदन केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा