Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३
पी एम बायोटेक चा दर्जेदार जैविक खतांचे आपल्या शेतातील फायदे
* जैविक खतांमुळे जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते, उत्पादन क्षमतेत वाढ होते.
* जोमदार मुळांची निर्मिती होते, त्यामुळे पीक लवकर स्थिर होते, पिकाची उगवण क्षमता वाढते.
* मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ झाल्यामुळे जमिनीत मुख्य खोडापासून दूरवर व खोलवर असणारी अन्नद्रव्ये, पाणी पिकास उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसते.
* पिकांची प्रतिकारशक्ती वाढते.
* जिवाणू खतातील जिवाणू पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात उदा. जिब्रेलीन, जीवनसत्व ब- १२, बायोटीन, इंडोल अॅसेटिक अॅसिड इत्यादीमुळे बियाणांच्या उगवणीवर व वाढीवर चांगला परिणाम होऊन उत्पादनवाढीस मदत होते.
* दुबार पिकासाठी उपयुक्त नत्रसाठा शिल्लक राहतो.
* पिकाचे उत्पादन १५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढते.
जिवाणू खते वापरताना...
* जिवाणू खताच्या बाटल्या उष्णतेच्या ठिकाणी किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवू नयेत. बाटलीस छिद्र पाडू नये.
* जिवाणू खते कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व रासायनिक खतांबरोबर मिसळू नयेत.
* जिवाणू खते बियाणास लावल्यानंतर बियाणे अर्धा तास सावलीत वाळवावे.
* जिवाणू खते दिलेल्या अंतिम तारखेनंतर वापरू नयेत.
* ज्या पिकासाठी शिफारस असेल, त्याच पिकासाठी वापरावीत.
जिवाणू खतांचा पिकावर अपेक्षित परिणाम दिसून न येण्याची कारणे -
* जमिनीत इतर अन्नद्रव्यांची कमतरता असणे.
* जमिनीत उपलब्ध नत्र खनिजाचा साठा जास्त असणे.
* वापरलेले जिवाणू खत निकृष्ट दर्जाचे असणे.
* शिफारशीपेक्षा जिवाणू खताचा वापर कमी केल्यास.
* जिवाणू खतात अन्य जिवाणूंची भेसळ असल्यास.
* जमिनीचा सामू जास्त असणे.
* मातीतील अपुरा ओलावा, अपुरे कर्ब व अपुरी सेंद्रीय पदार्थांची उपलब्धता.
द्रवरूप खतांची वैशिष्ट्ये -
* उपयुक्त जिवाणूंचा जीवित राहण्याचा कालावधी १२ ते २४ महिन्यांपर्यंत असतो.
* द्रवरूप जिवाणू खताची कार्यक्षमता प्रतिकूल
वातावरणातसुद्धा सारखी राहते.
* जास्त तापमानाचा (४०-४५ अंश पर्यंत) व अतिनील किरणांचा जिवाणूंवर कोणताही परिणाम होत नाही, त्यांचे गुणधर्म कायम राहतात.
* जिवाणूंची संख्या (१० ८- १० ९ प्रति मि.लि.) सतत स्थिर राखली जाते.
* विकरांची क्रिया खूपच जास्त असल्यामुळे शुद्धता राखली जाते, त्यामुळे दूषित होण्याचे प्रमाण खूपच कमी असते.
* द्रवरूप असल्यामुळे शेतक-यांना वापरण्यास व हाताळण्यास ही खते सोपी असतात.
* व्हेंच्युरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून अगदी सहजरीत्या पिकास देता येतात.
* बियांवर व जमिनीमध्ये जगण्याची क्षमता जास्त.
द्रवरूप जिवाणू खतांची उपलब्धता-
रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू, के एम बी ,झिंक बॅक्टरिया
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा