Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
गुंडांना पोलिसांनी शिकविला "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" याचा खरा अर्थ.पहूर पोलिसांनी गुंड प्रवृत्तींना घडवली जन्माची अद्दल..! खाकीवर हात उचलणार्यांना भर चौकात फटके...!
गुंडांना पोलिसांनी शिकविला "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" याचा खरा अर्थ.पहूर पोलिसांनी गुंड प्रवृत्तींना घडवली जन्माची अद्दल..! खाकीवर हात उचलणार्यांना भर चौकात फटके...!
जळगाव प्रतिनिधी:पहूर येथे कर्तव्यावर खाकीतील पोलीस कर्मचार्यांनी रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला घ्यावी म्हणून सांगितल्यानंतर दोघांनी पोलीस कर्मचार्यांवरच हात उचलला होता.आरोपी गुन्ह्यानंतर पसार झाले असले तरी त्यांच्या परभणीतून यंत्रणेने मुसक्या आवळल्या होत्या.गुन्हेगारीचे होत असलेले उदात्तीकरण रोखण्यासाठी शनिवारी पहूर पोलिसांनी गुन्हेगारांची शनिवारी सकाळी 11 वाजता धिंड काढत त्यांना भर चौकात चांगलेच फटकारेही दिले. खरोखर पोलिसांनी पोलीस दलाच्या ब्रीदवाक्य नुसार "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" ब्रिद वाक्यानुसार आपले रूप दाखवले.व हे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली तर पोलिसांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड घबराट उडाली.
आरोपींना चार दिवसांची कोठडी
कर्तव्य बजावत असणार्या पोलिस कर्मचार्यांना मारहाण करून गंभीर दुखापत करणार्या दोघा तरुणांना 19 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पहूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने परभणी येथून अटक केली.
शनिवार,0 रोजी दुपारी दोघा संशयीतांना जामनेर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रस्त्याच्या दुतर्फा जमली गर्दी
14 जानेवारी रोजी पहूर येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे कर्तव्य बजावत असताना पहूर बस स्थानकावर फिरोज शेख सुपडू शेख व त्याचा साथीदार खाजा तडवी यांची रस्त्यावर दुचाकी उभी केल्याने ती बाजूला घे असे बोलल्याचा राग आल्यामुळे दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला व हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. गुन्ह्यानंतर संशयीत अंडरग्राऊंड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत परभणीत त्यांना बेड्या ठोकल्या.आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आरोपींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली.
गुन्हेगारांना भर चौकात फटके
पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे,ईश्वर कोकणे यांनी आरोपींना अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक चौकापासून त्यांना फटके मारत पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा