Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई....! जळगाव जिल्हयातील अवैध धंद्यावर प्रतिबंध सर्व उविभागीय पोलीस अधिकारी,व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना निर्देशीत आदेश...!
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई....! जळगाव जिल्हयातील अवैध धंद्यावर प्रतिबंध सर्व उविभागीय पोलीस अधिकारी,व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना निर्देशीत आदेश...!
चोपडा प्रतिनिधी:मा.पोलीस अधीक्षक श्री एस राजकुमार सो जळगाव,
मा.अपर पोलीस अधीक्षक जळगाव श्री चंद्रकांत गवळी सो,मा.अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्री रमेश चोपडे सो मा उपविभागीय पोलीस अधिकारी चोपड़ा श्री ऋषीकेश रावले सो,सहा पोलीस अधीक्षक यांनी जळगाव जिल्हयात अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्यासाठी व हददीत पेट्रोलींग करण्याबाबत सुचना देवून योग्य ती कारवाई करणेबाबत जिल्हयातील सर्व उविभागीय पोलीस अधिकारी,व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश निर्देशीत केले होते.
मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री ऋषीकेश रावले सो यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मा सपोनि श्री संदिप दुनगहू सो यांना गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, दि. २३/०१/२०२३ रोजी सांगवी ता शिरपूर कडून एक महिंद्रा बोलेरो गाडी क्र MH.१९.AP.०९६५ मध्ये अवैध रित्या बिअर घेवून निघाली आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी पो.हे.को. ३५० लक्ष्मण शिंगणे,पो.हे.को.२४३८ राकेश पाटील,पो.को.३१३९ प्रमोद पारधी,चा.पो कॉ २९८९ विनोद पाटील यांना बोलावून वरील विषयावर माहिती समजावून सांगुन छापा टाकून कारवाई करणेबाबत आदेशीत केलेने वरील स्टाफ सरकारी वाहनाने रवाना होवून खा.यापाडा गावाचे हददीत लहान पुलाजवळ जावून वॉच केला असता सुमारे १७.४५ वा चे सुमारास मिळाले बातमीच्या अनुशंगाने एक बोलेरो गाडी क्र क्र MH.१९.AP.०९६५ येतांना दिसली तिची तपासणी केली असता त्यांत मांउन्ट्स ६००० सुपर स्ट्रॉग कंपनीच्या ५०० एम एल मापाच्या अॅल्युमिनीयमचे डब्बे (बाटल्या) चे ३५ खोके त्या एका खोक्यात २४ डब्बे असे एकुण ८४० डब्बे (बाटल्या एका डब्बेची किंमत १००/- रु. दराने एकुण ८४,०००/- रू किंमतीचा बियअरची वाहतुक करीत असतांना आरोपी नामे परशुराम रिता बारेला,वय ३३ वर्षे, रा. जिरायतपाडा ता चोपडा दिलीप नारायण बारेला,वय ४० वर्षे, रा देवझीरी, ता चोपडा हे मिळूने पो हे कॉ २४३८ राकेश पाटील यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हयात एकुण ४,८४०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे परशुराम रिता बारेला,वय ३३ वर्षे,रा.जिरायतपाडा ता चोपड़ा दिलीप नारायण बारेला, वय ४० वर्ष,रा देवझीरी,ता चोपडा यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री एस राजकुमार सो जळगाव,मा. अपर पोलीस अधीक्षक जळगाव श्री चंद्रकांत गवळी,मा.अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्री रमेश चोपडे सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषीकेश रावले सो मा सहा पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री संदिप दुनगहू,पोहे को लक्ष्मण शिंगाणे,पो हे कॉ राकेश पाटील,सहा फौज,देविदास ईशी,पो हे कॉ भरत नाईक,पो हे कॉ शिवाजी बाविस्कर,पोहे की राजु महाजन,पो ना शशिकांत पारधी चालक पो कॉ विनोद पाटील, पो को ३१३९ प्रमोद पारधी,कारवाई व मदत केली आहे.सदर गुन्हयाचा तपास पो हे कॉ लक्ष्मण शिंगणे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा