Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठ्याच्या अडचणींवर महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांची बिंदू शेठ शर्मा यांनी केली कान उघडनी



आज दिनांक 24 1 2023 रोजी साक्री येथील महावितरण कंपनी साक्री येथे शेतकऱ्यांच्या विजेचा समस्या संदर्भात त्यांचा समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चाचे श्री बिंदू शेठ शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत साक्री तालुक्यातील अनेक धाडणे शेणपूर तसेच काटवान भागातील काही गावे माळमाथावरील काही गावे तसेच पश्चिम पट्ट्यातील काही गावे यातून 500 ते 700 शेतकरी च्या उपस्थितीत आज साक्री तालुक्याचे विद्युत महामंडळाचे ज्युनिअर इंजिनियर यांच्या दालनात मोर्चाचे आयोजन करण्यात आले शेतकऱ्यांना विजे संदर्भात होणाऱ्या अडीअडचणींवर मार्ग काढण्यात साठी व त्यावर चर्चा करण्यात आली.त्यातील चर्चेचे मुख्य विषय म्हणजे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन मागणी केली आहे त्यांना त्वरित कोटेशन मंजूर करून देणे व ज्यांनी रोहीत्र मागणी अर्ज केले आहेत त्यांना नवीन रोहित बसवणे.तसेच ज्या शेतकऱ्यांना रोहित्र जळाले आहेत त्यांना त्वरित रोहित्र बसविणे व ज्यांना अतिरीक्त लोड असलेल्या रोहीत्र आहे त्यांना विभाजन करून नवीन ट्रान्सफर्मार उपलब्ध करून देणे तसेच ट्रांसफार्मर साठी लागणाऱ्या मेंटनस संदर्भात वायरमन किंवा विद्युत महामंडळाच्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडून निशुल्क असे सेवा पुरवणे व शेतकऱ्यांकडून कुठलीही तक्रार येऊ नये याची कर्मचारिनी काळजी ग्यावी यासारख्या अशा अनेक विषयांसंदर्भात सखोल चर्चा करून लवकरच यासंदर्भात वरिष्ठांना कळून मार्ग काढला जाईल असे आश्वासन विद्युत महामंडळाच्या अभियंत्यांनी यावेळी बिंदू शेठ शर्मा यांना दिले. यावेळी साखरी तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यात मुख्यत्वे भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष तसेच युवकांचे प्रेरणास्थान भाजप नेते चंद्रजीत पाटील साक्री तालुका अध्यक्ष वेडू अण्णा,राकेश दहिते,आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध