Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने वृद्धाश्रमात स्वेटर वाटप...!
शेगाव (प्रतिनिधी)आज दिनांक ६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका व शहर च्या वतीने सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय मंडळ द्वारा संचलित लोकनेते रामदासजी आठवले वृद्धाश्रमात आळसना रोड येथे,वृद्ध महिला व पुरुषांना स्वेटर वाटप करण्यात आले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो समाजातील एक घटक आहे.
तसेच तो सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे. समाजाचे हित जोपासण्यासाठी पत्रकार नेहमी समाजाचा आरसा मनून काम करीत असतो.बऱ्याच ठिकाणी मुलं ही आई-वडिलांना सांभाळत नसताना त्यांना नाइलाजसस्तव वृद्धाश्रमात जावे लागते.अशा वृद्धांप्रति आदर सत्काराची भावना ठेवून आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे शेगाव तालुका अध्यक्ष देवचंद्र समदूर यांच्या संकल्पनेतून संघटनेच्या माध्यमातून वृद्ध व्यक्तींना स्वेटर वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित वृद्धाश्रमाचे अधीक्षक बोधिसत्व गवई, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडूकार,संघटनेचे तालुकाध्यक्ष देवचंद्र समदूर,
तालुका उपाध्यक्ष इस्माईल शेख, शहराध्यक्ष उमेश राजगुरे,तालुका सचिव अर्जुन कराळे शहर उपाध्यक्ष दिनेश घाटोळ,तालुका कार्याध्यक्ष सागर सिरसाट,शहर सल्लागार श्रीकांत कलोरे,नारायण दाभाडे,ज्ञानेश्वर ताकोदे, रवी शेगोकार, ऋषिकेश देठे,आदींची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा