Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया एक देश, एक समाज, समान आरक्षणसाठी लढा उभारु : कनोजिया
अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया एक देश, एक समाज, समान आरक्षणसाठी लढा उभारु : कनोजिया
शिरपुर प्रतिनिधी : अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया यांची दुसर्यांदा बालाजी लाॅन्स, गंगापुर रोड नाशिक येथे राष्ट्रीय अधिवेशनात मतदानव्दारे निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी देशभरातुन आलेल्या १२९ मतदार पैकी १११ मतदारांनी मतदान केले तर विरोधी उमेदवारास १७ मते पडलीत. या अधिवेशनात बहुमताने दुसर्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान कृष्णकुमार कनोजिया यांना मिळाला आहे.
अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक लोकशाही पद्धतीने करण्यात आली.बालाजी लाॅन्स नाशिक येथे दि. २१ जानेवारी रोजी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.नंतर मतदान घेण्यात आले मतदानाव्दारे कृष्णकुमार कनोजिया हे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडुन आलेत. राष्ट्रीय मार्गदर्शक नेते राजेंद्र आहेर, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी,धुळे मनपा स्थायी समिती माजी सभापती सोनल शिंदे, तंटामुक्ती समिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ आदिंनी सत्कार केला.पुन्हा एकदा अध्यक्ष झाल्यानंतर कृष्णकुमार कनोजिया यांनी पंधरा राज्य व तीन केंद्र शासित राज्यात धोबी समाजाला अनुसुचित जाती (एस.सी) च्या सवलती लागु आहेत. देशभरात विखुरलेल्या समाजाला संघटित करून महाराष्ट्रासह इतर राज्यातील समाजाला एस.सी च्या सवलती मिळवण्यासाठी शासन दरबारी लढणार असुन एक देश,एक समाज, समान आरक्षणसाठी लढा उभारु वेळ पडली तर न्यायालयात जाऊ असे सांगितले.नाशिक येथे दि. २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी अधिवेशन झाले. देशभरातुन २७२ मतदारांपैकी १२९ मतदाररांसह विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी व प्रमुख नेते मिळुन ५०० प्रतिनिधी अधिवेशनास उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा