Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ०६ जानेवारी रोजीच्या जयंती निमित्ताने...! पत्रकार दिन पत्रकार पत्रकारांकडून उत्साहात साजरा...!
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ०६ जानेवारी रोजीच्या जयंती निमित्ताने...! पत्रकार दिन पत्रकार पत्रकारांकडून उत्साहात साजरा...!
शिरपूर प्रतिनिधी - मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ०६ जानेवारी रोजीच्या जयंती निमित्ताने राज्यभरात व देशभरात पत्रकार दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने शिरपूर शहरातील भारतीय पत्रकार महासंघ जिल्हा धुळे या संघाच्या वतीने शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण दलाल,ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुलकर्णी, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, रत्नदीप सिसोदिया,राजेंद्र पाटील, राजकुमार जैन (ग्रामीण उपाध्यक्ष धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ) रामदास पुरी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यासोबत आजची पत्रकारिता व त्यापुढील आव्हाने यावर चर्चा होऊन तालुक्याचे आमदार भाईसाहेब अमरीश भाई पटेल यांच्या प्रतिनिधींकडे तालुक्यातील पत्रकारांच्या विमा व पत्रकार भवन याबाबत मागणी करण्यात आली.त्यावर सकारात्मक प्रस्ताव तयार करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.
खरे तर पत्रकारिता हा देशाच्या लोकशाहीच्या चौथा खंबीर स्तंभ. पत्रकारांच्या जोरावरच राजकारण व सरकारी कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या कामाच्या बोलबाला असतो.समाजातील चांगले आणि वाईट घटकांच्या नेहमीच पत्रकार हा साक्षीदार असतो.मात्र शिरपूर तालुक्याच्या पत्रकारांच्या बाबतीत सरकारी आणि राजकीय पातळीवर नेहमीच उदासीनता दिसून येते.खरे तर वर्षातून एकदा येणारा पत्रकार दिवस हा प्रशासनाने किंवा राजकीय व्यक्तिमत्त्वांनी आयोजन करून पत्रकारांना सन्मानित करणे आवश्यक असताना गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व राजकारण्यांनी पत्रकार दिनाकडे पाठ फिरवली आहे.नाईलाजाने पत्रकार दिनी पत्रकारांनाच हा कार्यक्रम आयोजन करावा लागतो आणि पत्रकारांकडून दिलेल्या निमंत्रणात प्रतिसाद न देता शासकीय अधिकारी कार्यक्रमाला दांडी मारतात हे वास्तव आहे.
त्यामुळे किमान पत्रकारांच्या बातमीवर वर्षभर आपल्या राजकारण साधणाऱ्यांनी एक दिवस वर्षातून पत्रकारांच्या विचार करावा अन्यथा पत्रकारांनाच वेगळा विचार करावा लागेल असा सूर पत्रकार बांधवांमध्ये चर्चेला होता.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना दैनिक समाजशक्तीचे संपादक ईश्वर बोरसे यांनी केली.सूत्रसंचालन माझ्या खानदेश ते संपादक महेंद्र माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत चौधरी यांनी केले.यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातून व शहरातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा