Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ जानेवारी, २०२३
काव्यकुंज साहित्य समूह आयोजित कोकण विभाग मर्यादित काव्य संमेलन संपन्न...!
प्रतिनिधी:अक्षय कदम-नुतन वर्षाची सुरवात बहारदार करण्याकरिता काव्यकुंज साहित्य समूह आयोजित कोकण विभाग मर्यादित काव्य संमेलन "श्वास लेखनाचा,रुणझुणत्या पाखरांचा" यशस्वी रित्या संपन्न झाले.नवीन पर्व,नवीन दिशा घेऊन कोकणच्या लाल मातीमधील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून आयुष्याला नवीन ऊर्जा निर्माण करण्याचे काम "काव्यकुंज साहित्य समूह" यांच्या कडून करण्यात आले.
या ऊर्जादायी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभलेल्या मा.अश्विनी निवाते,संमेलनाचे अध्यक्ष मा.सागर डावल,उपाध्यक्ष मा.मिलिंद ठीक,तसेच प्रमुख मान्यवर जल फाऊंडेशनचे सल्लागार आदरणीय श्री.वसंत मोरे साहेब,तसेच पत्रकार,कवी, समाजसेवक,लेखक आणि काव्यकुंज साहित्य समूहाचे खजिनदार श्री.सुदर्शन शांताराम जाधव,पत्रकार-कवी अमित भुवड तसेच काव्यकुंज साहित्य समूहाचे सर्व सदस्य आणि उपस्थित कवींच्या,
मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्यकुंज साहित्य समुहाचे अध्यक्ष/कवी शैलेश निवाते सर यांनी केले,तर कार्यक्रमाची प्रस्तावना कवी-गितकार सिद्धेश उतेकर यांनी केले.
संमेलन मध्ये सहभागी झालेले कवी-कवियत्री पुढीलप्रमाणे सिद्धी गोरिवले,साक्षी सुशिल पाटील,स्नेहल रमेश गोठल,वेदांत पंडित,रत्नेश रामचंद्र बाईत,नितीन यशवंत मोरे,रोहन राजेंद्र सिनकर,सिद्धी संतोष चाळके,कल्पेश आत्माराम पारधी,तेजस महादेव फटकरे,भूषण सुनिल मोहित,रामचंद्र शांताराम कळंबाटे,अमित गणपत जावळे,स्वरूप शशिकांत सावंत,चेतन चंद्रकांत मोरे,अशोक पुंडलिक नार्वेकर,सानिया मंगेश सुर्वे,ओंकार भुवड,मानसी घुमे, भास्कर सदाशिव आग्रे,श्वेता संतोष चव्हाण,अनोद मुंडेकर,भूषण तांबे,
अवंतिका महाडिक,सुनिल माणका घाणेकर,रंजित वणे,गौरी यशवंत पंडित उत्कृष्ट दर्जेदार पद्धतीने पार पडला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा